मोदी, ठाकरे यांची निर्णयक्षमता संपली : प्रकाश आंबेडकरांची टीका 

देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही, हे आता कोविड- 19च्या पार्श्वभूमीवर दिसून आले आहे. तीच गत महाराष्ट्राची झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर निर्णय ढकलून मोकळे होतात. अशा निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो,
Modi, Thackeray's decision making capacity is exhausted: Prakash Ambedkar
Modi, Thackeray's decision making capacity is exhausted: Prakash Ambedkar

अकोला : देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही, हे आता कोविड- 19च्या पार्श्वभूमीवर दिसून आले आहे. तीच गत महाराष्ट्राची झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर निर्णय ढकलून मोकळे होतात. अशा निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला. 

राज्यात शाळा चालू करायच्या की नाहीत, हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून अधांतरी होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र हा निर्णय जिल्हा पातळीवर ढकलून दिला आहे. याचाच अर्थ यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता नाही. राजकीय नेतृत्व नाही, दूरदृष्टी नाही आणि बेभरवशावर हे राज्य सोडून दिले आहे. ही अवस्था "जाणता राजा'ची पण असल्याची खरमरीत टीका डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 

केंद्रात नरेंद्र मोदी नेतृत्व करू शकत नाही, ते निर्णय घेऊ शकत नाही, आपले निर्णय राज्यावर सोडून देतात आणि राज्यातले लोक जिल्ह्यावर निर्णय सोडून देतात. हे शाळाबाबतच्या निर्णयावरून दिसून आले आहे. अशा निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो. सरकारला आमची विनंती आहे की, शाळा सुरू करायच्या की नाही, हा निर्णय लवकर घ्या, नाही करायच्या असतील तर तसे स्पष्ट सांगा, करायच्या असतील तर केव्हा करणार, याचे वेळापत्रक जाहीर करा, वेळापत्रक जाहीर करताना जर तरची भाषा वापरायची नाही, असेही डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. 

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी "राष्ट्रवादी'ने घेतले पाच लोकांचे अभिप्राय 

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेस दहा जून रोजी 21 वर्षे पूर्ण झाली. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्ते व नागरिकांची मते जाणून घेण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी पक्षाचे पदाधिकारी राज्यातील पाच लाख लोकांपर्यंत पोचले आहेत. नागरिकांची मते, सूचना जाणून घेण्यासाठी "राष्ट्रवादी कॉंग्रेस अभिप्राय अभियान' हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अभिप्राय मोहिमेत सहभागी होण्यासाठी पक्षाच्या संकेतस्थळावरील लिंकवरील माहिती भरुन सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अभिप्राय अभियानास सुरूवात झाली आहे. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभाग नोंदवला असून राज्यात आतापर्यंत विविध माध्यमातून पाच लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोचता आले असल्याने या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

कोरोनाविरोधीतील लढ्यात तसेच येणाऱ्या काळात विविध प्रश्नांना तोंड देण्यासाठी कार्यकर्त्यांकडून येणारे अभिप्राय मोलाचे ठरत आहेत. या अभियानात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उभारणीत योगदान दिले आहे, अशा प्रत्येकाचे म्हणणे जाणून घेतले जात आहे. तसेच मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हा स्तरावरील पक्षाचे सर्व कार्यकर्ते, गाव व बूथ कमिटीचे कार्यकर्ते व अन्य पदाधिकाऱ्यांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत. गावपातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत पोचण्यासाठी इतक्‍या मोठ्या पातळीवर मोहीम हाती घेणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे. त्यानुसार पक्षाच्या सदस्यांना "राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अभिप्राय' या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com