मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बेशरमाचे झाड लावणार : आमदार रवी राणांची कडवट टीका - MLA Ravi Rana criticizes harshly CM Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बेशरमाचे झाड लावणार : आमदार रवी राणांची कडवट टीका

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 जुलै 2021

राणा आणि शिवसेना यांचा संघर्ष जुनाच... 

अमरावती : बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) हे सातत्याने चर्चेत राहतात. विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंड पळविण्याच्या प्रकरणी चार दिवसांपूर्वीच त्यांचे नाव झळकले होते. आता पुन्हा शिवसेनेवर आणि त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर त्यांनी कडवट टीका केली आहे.

त्याला निमित्त झाले आहे ते स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे. एमपीएससीची (MPSC) परीक्षा वेळेवर न झाल्याने या विद्यार्थ्याने एक जुलै रोजी आत्महत्या केली. या विद्यार्थ्याच्या कुटुंबियाला मदत करण्याचा विषय विधीमंडळातही आला. त्यावर राज्य सरकारने काही कारवाई केली नाही. त्यावरून राणा हे चिडले.

विधीमंडळाच्या अधिवेशनात गोरगरीब जनता, शेतकरी व युवकांचे प्रश्न विचारणार्‍या बारा आमदारांना निलंबित करण्यात आले. स्वप्निल लोणकर या युवकाने फक्त एमपीएससी परीक्षा घेऊन सुद्धा मुलाखतीला न बोलावल्यामुळे आत्महत्या केली, या सरकारने लॉकडाऊन मध्ये केलेला भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न निकाली काढले नाही तर `मातोश्री` समोर जाऊन बेशरमचे झाड लावणार आहे. आम्ही  कितीही ओरडून ज्या माणसाला कळतच नाही. असा बेशरम मुख्यमंत्री मी आयुष्यात पहायला नाही. बेशरमचे झाड लावल्यामुळे त्यांना काहीना काही फरक पडेल व ते राज्यातील जनतेला दिलासा देतील, अशी आक्षेपार्ह भाषा  रवी राणा यांनी वापरली आहे.

वाचा या बातम्या : प्रकाश जावडेकर, प्रसाद यांना हटविण्याची ही आहेत कारणे....

वैष्णव आणि दानवे यांच पटायचं कसं?

केदार आणि पटोले पावसात भिजले पण राऊत यांनी ढूंकूनही नाही पाहिले...

रवी राणा शिवसेनेमधील संघर्ष जुनाच आहे. त्यांच्या पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी कंबर कसली होती. त्यामुळे सेना आणि त्यांच्यात सतत कलगीतुरा रंगलेला असतो. शिवसेनेवर टीका करण्याची संधी हे दांपत्य सोडत नाही. राणा यांनी मात्र आज हद्द ओलांडत मुख्यमंत्र्यांना थेट बेशरम म्हणण्यापर्यंत मजल मारली आहे. त्याला शिवसेना आता कसे उत्तर देणार, हे पाहायला हवे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख