प्रकाश आंबेडकर यांचा राज्य सरकारला इशारा ; मजुरांनो, कामासाठी अर्ज करा

ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार हमी योजना किंवा मनरेगा अंतर्गत काम देण्यात यावे. त्यासाठी मजुरांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा.
Prakash_Ambedkar
Prakash_Ambedkar

अकोला : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाची लागण झालेली नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार हमी योजना किंवा मनरेगा अंतर्गत काम देण्यात यावे. त्यासाठी मजुरांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा, काम न दिल्यास पुढे काय करायचे ते मी सांगतो, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष  अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मजुरांना बुधवारी केले आहे. त्यातून प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा तितकासा फैलाव झालेला नाही.  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी खेड्यापाड्यांमध्ये मजुरांना दुरुस्तीचे काम, रस्त्याचे काम तसेच खोदकाम आदी कामे मिळत होती. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली नव्हती. मात्र, कोरानाच्या वाढत्या संकटामुळे आता हे काम बंद झाले आहे. शेतकरी, गरीब मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. काम मिळण्यासाठी गरज असलेल्या सर्व मजुरांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा आणि त्या अर्जामार्फत रोजगार हमी योजना किंवा मनरेगाद्वारे काम देण्याची मागणी करावी, असे आवाहन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

देशात नोकरी तसेच व्यवसाय करणाऱ्यांकडून सरकार मोठ्या प्रमाणावर टॅक्स वसूल करतात. याचे मुख्य कारण म्हणजे, ग्रामीण भागात गरीब मजूर, शेतकऱ्यांना रोजगार हमी योजना किंवा मनरेगा अंतर्गत काम मिळावे. त्यामुळे ज्या मजुरांना कामाची गरज आहे. त्यांनी सरपंच, तलाठी किंवा ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा, अर्ज दिल्यानंतर तीन दिवसात काम मिळाले नाही तर आपल्याला बेरोजगार भत्ता देण्याची सोय यामध्ये आहे. त्यामुळे सर्व मजुरांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. त्या अर्जाची एक प्रत आपल्याकडे ठेवावी तर दुसरी प्रत बीडीओ आणि तहसीलदाराकडे पाठविण्यात यावी. त्यांनी आपल्याला काम दिले नाही, तर पुढे काय करायचे ते मी सांगतो, असेही शेवटी  अॅड.  प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अशी आहेत मनरेगाची कामे 

१. जलसंधारण व जलसंवर्धन कामे
२. दुष्काळ प्रतिबंधक कामे (वनीकरण व वृक्ष लागवडीसह)
३. जलसिंचन कालव्यांची कामे (लघु व सुक्ष्म जलसिंचन कामासहित)
४. अनुसूचित जातीजमाती, द्रारिद्रयरेषेखालील, भुसुधार खालील व इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कर्जबाजारी लहान व अल्पशेतकरी यांच्या जमिनीसाठी जलसिंचन निर्माण करणारी कामे, फळझाड व भूसुधार कामे.
५. पारंपारिक पाणीसाठयांच्या योजनेचे नुतनीकरण करणे व तलावातील गाळ काढणे.
६. भूविकासाची कामे
७. पूरनियंत्रण, पूरसंरक्षणाची कामे, पाणथळ क्षेत्रात चा-याची कामे


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com