मुंबईचे पोलिस आयुक्त कशासाठी भेटले शरद पवारांना?  - Mumbai CP Paramvirsing Met Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईचे पोलिस आयुक्त कशासाठी भेटले शरद पवारांना? 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होती काय, अशीही एक चर्चा आहे. 

मुंबई : शहराचे पोलिस आयुक्त डाॅ. परमबीर सिंग यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सुमारे अर्धा तास चर्चा केली. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत काय झाले, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे.

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या पाली हिल येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने आज पाडून टाकले. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कंगनाने पुन्हा मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली आहे. यावरुन आता पुन्हा मोठा गदारोळ सुरू झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंगनाचे नाव न घेता खडे बोल सुनावले आहेत. 

या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंगनाचे नाव न घेता खडे बोल सुनावले होते. ते म्हणाले होते की, काहीही विधाने करणाऱ्यांना आपण अनावश्यक महत्व देत आहोत. अशा प्रकारच्या विधानांचा जनतेवर कितपत परिणाम होतो हे आधी पाहायला हवे. माझ्या मते, लोक अशा विधानांकडे फारशा गांभीर्याने घेत नाहीत. राज्यातील पोलीस कशाप्रकारे काम करतात हे महाराष्ट्र आणि मुंबईतील जनता वर्षानुवर्षे पाहत आली आहे. त्यांना पोलिसांची कार्यक्षमता माहिती आहे. त्यामुळे कोणी काही म्हणत असेल तर त्याला महत्व देऊ नये, असे पवार यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर ही भेट झाली किंवा आणखी काही मुद्यांवर चर्चा झाली, हे समजू शकले नाही. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होती काय, अशीही एक चर्चा आहे. 
Edited By - Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख