अरे बाSSपरे! अर्नाळ्यात करोना बाधित रुग्णाच्याअंत्यसंस्कारास पाचशेहून अधिक उपस्थिती

वसई विरार मध्ये करोना बाधित रुग्णांची संख्यामोठ्या झपाट्याने वाढत असताना अर्नाळा परिसरात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या परिसरातील एक करोना बाधित रुग्णाच्या अंत्यसंस्काराला शेकडो लोकांनी हजेरी लावली. यामुळेआता अर्नाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
Over Five Hundred People Present for Corona Dead's Last Rites in Vasai
Over Five Hundred People Present for Corona Dead's Last Rites in Vasai

वसई : वसई विरार मध्ये करोना बाधित रुग्णांची संख्यामोठ्या झपाट्याने वाढत असताना अर्नाळा परिसरात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या परिसरातील एक करोना बाधित रुग्णाच्या अंत्यसंस्काराला शेकडो लोकांनी हजेरी लावली. यामुळेआता अर्नाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

विशेष म्हणजे या रुग्णाच्या मृत्यू नंतर त्याचे करोना चाचणीचे अहवाल हाती आले नसतानाही रुग्णलयाने त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. आणि नातेवाईकांनी मोठ्या गर्दीत त्यांचे अंत्यसंस्कार उरकल्यानंतर त्या रुग्णाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे वसई विरार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांनी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा केलाआहे.

अर्नाळा येथे राहणारे ५८ वर्षीय प्रतिष्ठित गृहस्थ यकृताच्या आजारासाठी वसईच्या कार्डिनल ग्रेसीस (बंगली) रुग्णालयात उपचार घेत होते. रुग्णालयाने त्यांचे नमुने कोविड १९ च्या चाचणीसाठी पाठवले होते. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांचा अहवाल येण्याच्या आधीच रुग्णालयाने त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. 

त्यांच्या अंत्ययात्रेला पाचशेहून अधिक लोक उपस्थित होते. त्यामुळे वसई विरार पालिकेने वसई पोलीस ठाण्यातगुन्हा करण्यात आला आहे. दरम्यान कार्डिनल ग्रेसीस रुग्णालयाचे वैद्यकीयअधीक्षक डॉ.राजेश शहा यांनी आम्ही सर्व नियम पाळून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून मृतदेहातून कोरोना चा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com