तीन  पक्षाचे सरकार महापालिका निवडणुकांना घाबरते.... - Maha Vikas Aghadi Afraid of Election Claims BJP MLA Prasad Lad | Politics Marathi News - Sarkarnama

तीन  पक्षाचे सरकार महापालिका निवडणुकांना घाबरते....

संदीप पंडित
सोमवार, 5 एप्रिल 2021

तीन पक्षाचे सरकार गेल्या सहा महिन्यापूर्वी  मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुका न घेता प्रशासकांना मुदत वाढ देत आहे. कोरोनाचे भय  तर दुसऱ्या बाजूला पंढरपूरच्या पोटनिवडणुकीला कोरोनाचा काहीही अडसर असल्याचे दिसत नसल्याची टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि वसई विरार चे प्रभारी प्रसाद लाड यांनी राज्य सरकारवर केली आहे. 

विरार  : तीन पक्षाचे सरकार गेल्या सहा महिन्यापूर्वी  मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुका न घेता प्रशासकांना मुदत वाढ देत आहे. एका बाजूला कोरोनाचे भय तर दुसऱ्या बाजूला पंढरपूरच्या (Pandharpur) पोटनिवडणुकीला कोरोनाचा काहीही अडसर असल्याचे दिसत नसल्याची टीका भाजपचे (BJP)  प्रदेश उपाध्यक्ष आणि वसई विरार चे प्रभारी प्रसाद लाड यांनी राज्य सरकारवर केली आहे. Maha Vikas Aghadi Afraid of Election Claims BJP MLA Prasad Lad 

कोरोनाचे (Corona) सावट देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणतात आहे महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही त्यामुळे निवडणुका (Elections) पुढे ढकलल्या जात आहेत असेही त्यांनी सांगितले. वसई विरार महा पालिकेचे मुदत २८ जून २०२० ला संपली असून सहा महिन्यात याठिकाणची निवडणूक व्हायला  हवी होती; परंतु, कोरोना मुळे ही निवडणूक  येऊन या ठिकाणी गंगाधरन डी  यांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले. दिवाळी नंतर कोरोनाचे रुग्ण कमी झाले असताना  फेब्रुवारी मध्ये पालिकेच्या निवडणुका होऊ शकल्या असत्या. परंतु, या ठिकाणची सत्ता आपल्याला मिळणार नसल्याने पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलून प्रशासकाच्या माध्यमातून काम   करणाचे धोरण शासनाने अवलंबिले आहे,'' असा आरोप लाड यांनी केला आहे. 

महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) एकवाक्यता नाही जनतेचा यांना पाठिंबा नाही त्यामुळे आपण निवडून येऊ शकत नाही  म्हणून कोरोनाचे निवडणुका पुढे ढकलण्यात  येत असल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.Maha Vikas Aghadi Afraid of Election Claims BJP MLA Prasad Lad

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई महापालिका भाजपकडे आहे, कल्याण डोंबिवली महापालिका शिवसेनेकडे तर पालघर जिल्ह्यातील वसई - विरार  महानगरपालिका बहुजन विकास आघाडी कडे आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख