भूत उतरविण्यासाठी चार तास मारहाण; मायलेकाचा मृत्यू 

कल्याणजवळील अटाळी गावात अंधश्रद्धेतून करण्यात आलेल्या मारहाणीत मायलेकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी (ता. २५ जुलै) उघडकीस आला आहे.
भूत उतरविण्यासाठी चार तास मारहाण; मायलेकाचा मृत्यू 
भूत उतरविण्यासाठी चार तास मारहाण; मायलेकाचा मृत्यू 

कल्याण : कल्याणजवळील अटाळी गावात अंधश्रद्धेतून करण्यात आलेल्या मारहाणीत मायलेकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी (ता. २५ जुलै) उघडकीस आला आहे. अंगातील भूत उतरविण्यासाठी मांत्रिकाच्या सल्ल्याने काठीने मारहाण केल्यामुळे पंढरीनाथ तरे (५०) आणि चंदूबाई तरे (७३) या दोघांचा यात मृत्यू झाला आहे. 

अंधश्रद्धेतून घडलेल्या या हत्येप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मांत्रिकासह दोघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीनला ताब्यात घेण्यात आले आहे. अटाळी परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय कविता करे हिच्या अंगात मागील काही दिवसांपासून दैवीशक्ती येत असल्याचे सांगण्यात आले.

उपचारासाठी तिची आई संगीता तरे तसेच काकू रेश्‍मा तरे कविताला घेऊन सुरेंद्र पाटील यांच्याकडे जात होत्या. मांत्रिकाने मुलीचा काका पंढरीनाथ तरे आणि आजी चंदूबाई तरे यांच्या अंगात भूत असल्याचे सांगितले. हे भूत उतरवण्यासाठी शनिवारी मांत्रिकाने काही विधी सांगितले. त्यानुसार संबंधित काका आणि आजीच्या अंगावर हळद टाकून त्यांना काठीने मारहाण करायला सुरुवात केली. चार तास झालेल्या मारहाणीमध्ये या दोघांचा मृत्यू झाला आहे.

खडकपाडा पोलिसांनी त्वरित कारवाई करून मांत्रिक सुरेंद्र पाटील याच्यासह मृत पंढरीनाथ यांची पुतणी कविता तरे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन पुतण्यास ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्या संशयित आरोपींना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

Edited By Vijay Dudhale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com