भिवंडी : भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे. गोळीबार चुकवल्याने दीपक म्हात्रे या हल्ल्यात थोडक्यात बचावले आहेत.
ठाण्याहून आपलं काम आटपून काल्हेर मध्ये आल्यानंतर पाळत ठेवून असलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळीबार केले. वेळीच हा गोळीबार चुकवल्याने म्हात्रे यात बचावले. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. या घटनेनंतर नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.
Edited By - Amit Golwalkar

