पालघर साधू हत्याकांडप्रकरणी सुमारे ११ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

दाखल करण्यात आलेल्या दोषारोप नुसार दोन साधू व वाहन चालकांची हत्या अफवेतून घडली असल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यात आले असून त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई होण्यासाठी बाल न्याय मंडळाला अहवाल सादर करण्यात येणार आहे
Chargesheet filed in Palghar Lynching Case
Chargesheet filed in Palghar Lynching Case

तलासरी :  पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्‍यात गडचिंचले येथे लॉकडाऊन काळात झालेल्या दोन साधू व त्यांच्या वाहन चालकाच्या हत्येप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागा मार्फत डहाणू न्यायालयात १०,९१६ पानाचे आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. साधू हत्याकांड प्रकरणात १५४ आरोपी व ११ अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. ही हत्या अफवेतून घडल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे. 

गुन्ह्याच्या तपासात गुन्हे अन्वेषण विभागाकडून एकूण ८०८ संशयित व ११८ व्यक्तींकडे तपास करून भक्कम पुरावा गोळा करीत १५४ आरोपी व ११ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी कुणालाही अद्याप जामीन देण्यात आलेला नसल्याची माहिती तपास पथकाकडून देण्यात आली आहे. 

दाखल करण्यात आलेल्या दोषारोप नुसार दोन साधू व वाहन चालकांची हत्या अफवेतून घडली असल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यात आले असून त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई होण्यासाठी बाल न्याय मंडळाला अहवाल सादर करण्यात येणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com