ठाण्यात कोरोना रुग्ण 'हरवला'; महापालिका शोधणार ४८ तासांत?

ठाण्यातील एका ७२ वर्षीय पॅरालिसिस व कोविड संसर्ग झालेल्या वृद्धाला विशेष कोविड रुग्णालयात ४ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा दोन दिवसांपासून शोध लागत नाही. त्यामुळे संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली होती.
Corona Patient Missing from Thane Covid Hospital
Corona Patient Missing from Thane Covid Hospital

ठाणे  : महापालिकेच्या विशेष कोविड रुग्णालयातून हरविलेल्या एक ७२ वर्षीय रुग्ण हरवला आहे. या रुग्णाचा ४८ तासांत शोध घेण्यात येईल, असे आश्‍वासन महापालिकेने भाजपच्या शिष्टमंडळाला दिले आहे. दरम्यान, या ढिसाळ प्रकाराबद्दल कोविड रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या व आमदार निरंजन डावखरे यांनी कापूरबावडी पोलिसांकडे केली आहे.

ठाण्यातील एका ७२ वर्षीय पॅरालिसिस व कोविड संसर्ग झालेल्या वृद्धाला विशेष कोविड रुग्णालयात ४ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा दोन दिवसांपासून शोध लागत नाही. त्यामुळे संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली होती. या तक्रारीनंतर भाजपचे ठाणे प्रभारी किरीट सोमय्या व आमदार निरंजन डावखरे यांनी आज कापूरबावडी पोलिस ठाण्यात निवेदन देऊन रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सनदी अधिकारी रणजीतकुमार व कोविड रुग्णालयाचे अधिव्याख्याता डॉ. योगेश शर्मा यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात आले. या वेळी हरविलेल्या रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते.

रुग्णालयाचा ढिसाळपणा केला मान्य

गेल्या तीन दिवसांपासून संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांना महापालिका व पोलिस यंत्रणांकडून दाद दिली जात नव्हती. मात्र, काल भाजप नेत्यांसोबत महापालिका व पोलिस अधिकाऱ्यांशी या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी महापालिका आणि विशेष कोविड रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचा ढिसाळपणा झाला असल्याचे मान्य करण्यात आले आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. महापालिकेच्या ताब्यात असलेला रुग्ण हरविल्यावर 'मिसिंग'ची तक्रार दाखल कशी केली जाऊ शकते, असा सवाल किरीट सोमय्या यांनी पोलिसांना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com