मुख्यमंत्री निवासस्थानास घेराव घालण्यास निघालेल्या एमआयएम मोर्चेक-यांना भिवंडीतच अटक.

मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानास घेराव घालण्यासाठी निघालेल्या एमआयएम भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू शेख यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांना भिवंडीतील स्व.आनंद दिघे चौक या ठिकाणी शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.
Bhiwandi Police Arrested MIM Workers Going to Gherao CM Residence
Bhiwandi Police Arrested MIM Workers Going to Gherao CM Residence

भिवंडी  : भिवंडी शहरात वीज वितरण करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनी कडील वाढीव बिल कमी करावे व शासनाने कोरोना लॉक डाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे, या मागण्यांसाठी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानास घेराव घालण्यासाठी  निघालेल्या एमआयएम भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू शेख यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांना  भिवंडीतील स्व.आनंद दिघे चौक या ठिकाणी शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.

शहरातील वीज ग्राहकांना वाढीव बिलांच्या विरोधात सुरवातीपासून आक्रमक असलेले एमआयएम शहराध्यक्ष खालिद गुड्डू शेख यांनी  तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे,  अशी मागणी करून 20 जुलै रोजी मुंबई येथील मातोश्री निवासस्थानास  घेराव घालण्या बाबतची घोषणा  केली होती. त्यामुळे काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास  शहरातील स्व. आनंद दिघे चौकात कार्यकर्त्यांसह अध्यक्ष खालिद गुड्डू येताच शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे, पो.नि.कांबळे यांच्या विशेष पोलीस पथकाने एमआयएम पक्षाच्या अध्यक्षासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांना  तात्काळ ताब्यात घेत पोलीस व्हॅन मध्ये डांबून सर्वांची रवानगी शहर पोलीस ठाण्यात केली.

यावेळी पोलिसांनी अध्यक्षासह दहा ते बारा मुख्य कार्यकर्त्यांसह इतरांवर शहर पोलिसांनी भादवी कलम 188 सह मनाई आदेश 136 चे उल्लंघन करण्यासह राष्ट्रीय आपत्ती अधिनियम कायद्या अंतर्गत साथरोग प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे.

(Edited By - Amit Golwalkar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com