माणुसकीलाच झाली कोरोनाची लागण : पाॅझिटिव्ह असल्याच्या संशयातून ज्येष्ठ नागरिकाचे पाणी तोडले

कोकणात अडीच महिने लॉकडाऊनमुळे अडकलेले एक ज्येष्ठ नागरिक बदलापूर पश्‍चिमेकडील हेंद्रेपाडा परिसरातील आपल्या राहत्या घरी आले. मात्र, त्यांना कोरोना झालेला असू शकतो का केवळ संशयाने संबंधित सोसायटीने त्यांच्या घराचा पाणीपुरवठा बंद केला.
Badlapur Society Cut Dawn Water of Senior Citizens Home
Badlapur Society Cut Dawn Water of Senior Citizens Home

कल्याण  : कोरोनातून बऱ्या झालेल्या नागरिकांचे सोसायट्यांमध्ये वाजतगाजत स्वागत होत आहे, असे चित्र अनेक ठिकाणी दिसले.  बदलापुरात मात्र माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

कोकणात अडीच महिने लॉकडाऊनमुळे अडकलेले एक ज्येष्ठ नागरिक बदलापूर पश्‍चिमेकडील हेंद्रेपाडा परिसरातील आपल्या राहत्या घरी आले. मात्र, त्यांना कोरोना झालेला असू शकतो का केवळ संशयाने संबंधित सोसायटीने त्यांच्या घराचा पाणीपुरवठा बंद केला. एवढ्यावरच न थांबता या वृद्धाला मदत करणाऱ्या कुटुंबालाही वाळीत टाकून त्यांचेही पाणी बंद करुन टाकण्याचा प्रताप या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. 

पोलिसांत हे प्रकरण गेल्यावर मात्र सोसायटीचे पदाधिकारी नरमले. बदलापूरसारख्या सुशिक्षित, सुसंस्कृत शहरात ही घृणास्पद घटना घडते याचा अर्थ माणुसकीलाच कोरोनाचा संसर्ग झाला आहे काय अशी चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे. कोकणातील आपल्या गावाहून परतण्यापूर्वी संबंधित ज्येष्ठ नागरिकाने आपली वैद्यकीय चाचणी करून घेतली होती. त्यानंतरच ते स्वतःच्या खाजगी वाहनाने बदलापुरात परतले. नियमानुसार त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईनही करुन घेतले. त्या काळात सोसायटीतील एका कुटुंबाने या ज्येष्ठाला माणुसकीच्या नात्याने जेवण व पाणी दिले. 

मात्र त्यांच्याकडून आपल्याला कोरोनाचा धोका आहे, या भीतीपोटी सोसायटीने हे ज्येष्ठ नागरिक व त्यांना मदत करणाऱ्या कुटुंबाला चक्क वाळीत टाकले. आपला पाणीपुरवठाही सोसायटीने बंद केल्याचा आरोप या कुटुंबांनी केला आहे.  स्वतः क्वारंटाईन असल्यामुळे पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी जाण्यास ज्येष्ठ नागरिकाला शक्य होत नव्हते.  समाजसेविका माधुरी शिंदे यांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी बदलापूर पोलिस ठाण्यामध्ये ही बाब जाऊन सांगितली. 

पोलिसांनी माधुरी वेळ न दवडता लागलीच दोन पोलिस कर्मचाऱ्यांना संबंधित सोसायटीत पाठवले. पोलिसांनी कडक समज दिल्यानंतर सोसायटीला बंद केलेला पाणीपुरवठा पुन्हा सुरु करावा लागला. त्यानंतर सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ठाण्यात बोलावून समज दिली. 

होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीचे पाणी कापणे योग्य नाही अशी समज आम्ही सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना दिली आहे. आता हे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांना मदत करणाऱ्या कुटुंबाला कोणताही त्रास नाही, असे बदलापूर (पश्चिम) पोलिस ठाण्याचे निरिक्षक अनुकूल दोंदे यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com