येरवडा : गेल्या लॉकडाउनपासून येरवडा, विमाननगर, विश्रांतवाडी, चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘तीन पत्ते’ ( फ्लॅश) खेळणारे जुगारी येत होते. त्यांच्यावर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली होती. पण पोलिस आल्याचे समजताच हे जुगारी येथूल पसार होत होते. ‘तीन पत्ते’ खेळणाऱ्यांना गजाआड करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर 'डाव' टाकला अन् २६ जणांना बेड्या ठोकण्यात त्यांना यश मिळाले. Yerawada police arrest 26 Playing cards
धानोरी येथील घरात जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस उपायुक्त पंकज देशमुख Pankaj Deshmukh, येरवडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी मजुरांच्या वेशात टेम्पोत गेले. जुगाराच्या खोलीच्या दोन्ही दरवाजातून पोलिस आल्यामुळे त्यांना पळता भूई थोडी झाली. कोणालाही पळता आले नाही. त्यामुळे जुगार चालकांसह तब्बल २६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती विश्रांतवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी सांगितले.
जुगार सुरू असलेल्या ठिकाणी पोहचल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता दोन्ही दरवाजाचा ताबा घेतला. त्यामुळे कोणालाही हालचाल करता आली नाही. जुगार चालक व जुगार खेळणाऱ्यांवर २६ जणांना ताब्यात घेतले. स्वत: देशमुख टेम्पो चालक तर पोलिस कर्मचारी मजुरांच्या वेशात कारवाई करण्यासाठी गेले. त्यामुळे कोणालाही शंका आली नाही. त्यांच्याकडून ७२ हजार रूपये रोख, तीन मोटारी, अकरा मोबाईल जप्त केले. धानोरी येथील घरात जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनिय माहिती देशमुख यांना मिळाली होती. त्यामुळे ते स्वत: येरवडा पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना घेऊन जुगार अड्ड्यावर कारवाई केली.
विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातील धानोरी येथे जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यामुळे कोणालाही सुगावा लागू नये म्हणून वेशांतर करून जुगार अड्ड्यावर कारवाई केली.
पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, परिमंडळ चार
२६ जणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र जुगार कायदा, आपत्ती व्यवस्थापन, साथरोग अधिनियम या अंतर्गत जालिंदर रणपिसे, भिवाजी गाडगे, चंद्रमणी जाधव, किशोर पंडित, ज्ञानेश्वर सपकाळ, ऋषीकेश सावंत, लहु कदम, मंगेश बहाले, संदन फलके, उदयसिंग शिकरवार, विशाल थिटे, अनिल भुजबळ, संतोष तोडगिरे, सोमेश्वर कंजारे, विजय तेरेदेसाई, वेंकटेश कल्लम, अमोल लबडे, सुजित जाधव, अभिजित गावडे, अतुल शेख, संदिप सातपुते, सौरभ कांबळे, वर्षन उंबरेटकर, गोरख कांबळे तर जुगार अड्डा चालक विशाल पारखे, सुनिल दिपक टिंगरे अशा २६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती चांदखेड यांनी दिली.
Edited by : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.