यशवंतराव होळकर यांनी जेजुरीत भंडारा उधळला..! 

यशवंतराव होळकर यांनी जेजुरीत उपस्थित राहून पुतळ्याची पाहणी केली. सर्व पाय-या चढुन यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करीत जेजुरीत पुजा करुन तळी उचलली तर भंडारा खोबरं उधळून मार्तंड भैरवाचे चांगभलं म्हणत खांडा उचलला होता.
 Yashwantrao Holkar .jpg
Yashwantrao Holkar .jpg

पुणे : माळव्याचे शेवटचे महाराजा द्वितीय यशवंतराव होळकर यांचे नातु श्रीमंत यशवंतराव शिवाजीराव होळकर यांनी (ता. २४ जानेवारी) रोजी जेजुरीत उपस्थित राहून यळकोट यळकोट जय मल्हार करीत मल्हारी मार्तडांची पुजा केली. 

जेजुरीत श्री मार्तंड देवस्थानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला असुन पुतळ्याचे अनावरण दि.13 फेब्रुवारी रोजी यशवंतराव होळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे यशवंतराव होळकर यांनी जेजुरीत उपस्थित राहून पुतळ्याची पाहणी केली. सर्व पाय-या चढुन यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करीत जेजुरीत पुजा करुन तळी उचलली तर भंडारा खोबरं उधळून मार्तंड भैरवाचे चांगभलं म्हणत खांडा उचलला होता. 

दर्शनानंतर यशवंतराव यांनी जेजुरीच्या जनतेशी संवाद साधुन सर्वांना अभिवादन केले. यावेळी होळकर राजघराण्यांच्या युवराजाला बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती, तर होळकर वाड्यात जागरण गोधंळ पार पाडतांना मानाची वारीही यशवंतरावांनी मागीतली देवपूजा व जागरण गोधंळादरम्यान यशवंतरावांच्या खांद्यावर घोगंडी व होळकरी पगडी परिधान केलेली होती.

जेजुरी चे मल्हारी मार्तंड देवस्थान होळकर राजघराण्याचे कुलदैवत असुन सुभेदार मल्हारराव होळकर, तुकोजीराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर यांनी जेजुरीचे मल्हारी मार्तंड मंदिर भव्य दिव्य निर्माण करण्यासाठी नगारखाना मंदिराची तटबंदी, मुख्य गाभारा, दिपमाळ, तसेच पाय-या सह तलावाची निर्मिती केली होती. 

जेजुरी समृध्द करण्यासाठी होळकरांचा मोठा वाटा आहे. द्वितीय यशवंतराव होळकर यांनी राजगादीवर बसण्याआधी मल्हारी मार्तडांचे जेजुरीत येवून दर्शन घेतले होते. त्यांच्या नंतर त्यांचे नातु आज जेजुरीत दाखल झाल्याने अखिल महाराष्ट्र धनगर समाज संस्थानने त्यांच्या हस्ते पुजा व जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन होळकर वाड्यात केले होते. होळकरांच्या नातवाचे आगमन होणार असल्याने होळकर वाडा सजवून,मंडपसह रोषणाई करण्यात आली होती.

यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारात यशवंतरावांना " शेला"भेट देण्यात आला होळकरांचे मामा जहागीरदार अमरजीतराजे बारगळ, अखिल महाराष्ट्र धनगर समाज संस्थेचे अध्यक्ष अकुंशराव भांड, होळकर रियासतचे अभ्यासक रामभाऊ लांडे, कुलोपाध्याय खाडे, देवस्थानचे संचालक शिवराज झगडे, सह संस्थेचे सचिव सुनील शेंडगे, गोविंदराव कवितके, पुणे शहराध्यक्ष चंद्रकांत मोरे, रमेश नाचण, किरण हुगे, सुरेश भांड, संपादक गणेश पुजारी, धनजंय तानले, संभाजी ब्रिगेड चे प्रवीण गायकवाड हे उपस्थित होते. तर यशवंतराव यांच्या समवेत असलेल्या सौ. कुतांबाई घुले यांचा डाँ.श्वेता चौधरी यांनी सत्कार केला. 

सुभेदार मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव जेजुरी पासुन जवळ असलेले होळ मुरुम आहे. त्यांच्या आईवडीलांनी मल्हारी मार्तडांच्या आशीर्वादाने पुत्र झाल्याने मल्हारराव नाव ठेवले होते. मल्हारराव होळकर सुभेदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा कायापालट केले. होळकर राजघराण्यातील प्रत्येक वारसदार जेजुरीत दर्शनासाठी येतो, असे द्वितीय यशवंतराव होळकर यांच्या नंतर त्यांचे नातु यशवंतराव होळकर यांनी जेजुरीत येवून यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडारा उधळला आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com