मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान भूमिका का मांडत नाहीत? सचिन सावंतांचा सवाल

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण तापले आहे. यावरुन राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत.
why narendra modi in not taking stand on maratha reservation asks sachin sawant
why narendra modi in not taking stand on maratha reservation asks sachin sawant

पुणे : राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे व योग्य दिशेने प्रयत्न करीत आहे. मात्र, मराठा आरक्षणाबाबत भारतीय जनता पक्षाचे खाण्याचे व दाखवण्याचे दात वेगळे आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा आरक्षणाबाबत का भूमिका मांडत नाहीत, अशी विचारणा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यांनी आज केली. भाजपने कितीही चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न केला तरी राज्य सरकार आरक्षणासाठी योग्य दिशेने काम करीत असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

पुण्यात बोलताना सावंत यांनी भाजपवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, "खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर वेळ मागूनही पंतप्रधान मोदी त्यांना वेळ देत नाहीत. यातून मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारची नकारात्मक भावना लक्षात येते. मराठ्यांना आरक्षण मिळविण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार योग्य पावले उचलत आहे. सर्वोच्च न्यायालयातही राज्य सरकारने योग्य वेळी अर्ज केला आहे. त्यामुळे या विषयावरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याची भाजपची खेळी यशस्वी होणार नाही.'' 

''आरक्षणाबाबत मराठा समाजाची जी भावना आहे. तीच भावना राज्य सरकारची आहे. त्या भावनेतूनच राज्य सरकार काम करीत आहे. न्यायालयातही राज्य सरकार योग्य ती पावले उचलत आहे. मराठा समाजाला अंतिमत: आरक्षण मिळेत, अशी योजना राज्य सरकार करीत आहे. या विषयात काम करताना फडणवीस सरकारच्या काळात इतरांना विश्‍वासात घेतले जात नव्हते. याउलट सध्याचे आघाडी सरकार सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन जात आहे. त्यांच्याशी आवश्‍यक वाटेल त्यावेळी चर्चा करत आहे. आरक्षणाच्या विषयावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या कामात गोंधळ होईल, अशी भूमिका भाजपाने घेऊ नये,'' असे सावंत यांनी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी राज्य सरकारच्या वतीने वकील हजर राहिला नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मराठा समाजात अस्वस्थतता पसरली आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांनीही सरकारवर टीका करीत धारेवर धरले आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याची चर्चा त्यामुळे वाढीस लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर सावंत यांनी आज राज्य सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com