पुण्यातील लाॅकडाऊन कधी संपणार? : याचे उत्तर आहे या आकड्यात!

गेले दीड महिने पुणेकर लाॅकडाऊनच्या छायेत आहेत.
pune curfew ff day one
pune curfew ff day one

पुणे : पुणेकरांना सध्या कोरोना संकटात दिलासा मिळत असून दहा मे रोजी आढळलेल्या रुग्णांची संख्या केवळ 1165 होती. (Only 1165 new corona patients in Pune on 10th May)  गेल्या २० दिवसांत 23 हजाराने रुग्णसंख्या कमी झाली.  सुमारे ३ हजार बेड्स रिकामे आहेत. पुण्यातील लाट ओसरण्याची ही चिन्हे आहेत. त्यामुळे पुण्यातील लाॅकडाऊन केव्हा शिथिल होणार, असा आता प्रश्न उपस्थित होत आहे आणि त्याचे उत्तर आहे ते पाॅझिटिव्हिट रेटमध्ये! (Positivity Rate)

पुणेकरांवर गेल्या आठवड्यामध्ये मोठे संकट कोसळण्याची शक्यता होती. उच्च न्यायालयात (Mumbai high court) पुण्याची जुनी आकडेवारी सादर झाल्याने न्यायालयाने पुण्यात कठोर लाॅकडाऊन लावावा, अशी सूचना केली होती. सध्याच्या परिस्थितीने वैतागलेले व्यावसायिक, व्यापारी, नोकरदार सारीच मंडळी धास्तावली होती. प्रत्यक्षात पुण्यातील पाॅझिटिव्हिटी रेट हा पाच टक्क्यांच्या खाली आला की लाॅकडाऊन शिथिल होऊ शकतो. (एकूण झालेल्या चाचण्यांमध्ये किती नवीन रुग्ण आढळले यावर हा दर ठरतो.) पुण्यात गेल्या महिन्यात रोज सरासरी 25 ते 30 हजार चाचण्या एका दिवसात होत होत्या. यातील काही दिवस पाॅझिटिव्हिटी रेट हा 30 टक्क्यांवर गेल्याने सात हजारांपर्यंत नवे कोरोना रुग्ण सापडत होते. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून यात घट होण्यास सुरवात झाली. 10 मे रोजी हा पाॅझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांवर आला. या दिवशी 11499 स्वाॅबची तपासणी करण्यात आली आणि 1104 नवीन रुग्ण सापडले.  त्यामुळे हा दर दहा टक्क्यांवर आल्याचे स्पष्ट झाले आहे. हा दर आणखी निम्म्याने म्हणजे पाच टक्क्यांवर घटला की लाॅकडाऊन शिथिल करण्याचा मार्ग खुला आहे. यानुसार समजा 100 स्वाॅबची चाचणी झाल्यानंतर केवळ पाच नवीन रुग्ण आढळणे अपेक्षित आहे. 

याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ  म्हणाले की  न्यायालयात ज्या दिवशी ही आकडेवारी सादर केली तेव्हा पुण्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३८ हजार होती. तर मुंबईतील संख्या ५० हजाराच्या पुढे होती. आजही पुणेही शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण सुमारे 30 हजार आहेत. गेल्या तीन महिन्यांत २ लाख ५० हजार नवे रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यासाठी मोठी व्यवस्था महापालिकेला उभी करावी लागली. या काळात पुणेकरांनी खूप संयम राखला याचे कौतुक आहे. सर्व राजकीय पक्षांनी, सामाजिक संस्था यांनी देखील साथ दिली आहे. नियोजन करताना त्यांचा सहभाग होता. त्यामुळेच शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने खाली आली आहे.
देशात सर्वाधिक २२ लाख ८० हजार जणांचे टेस्टिंग पुण्यात झाले आहे. ९ लाख जणांचे लसीकरण झाले असून, त्यामध्ये १ लाख जणांचे दोन्ही डोस झालेले आहेत. महापालिका स्वतःचे ७ आॅक्सिजन जनरेटर प्लांट उभे करत आहेत. त्यात १७०० लिटर प्रत्येक मिनीट क्षमतेचा प्लांट १४ दिवसात दळवी रुग्णालयात सुरू झाला आहे. आजची स्थिती नियंत्रणात असताना, उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या अधिवक्त्याने वस्तुस्थितीचा अभाव असलेली माहिती सादर करण्यात आली. पुण्यात १२ हजार १०७  इतके बेड आहेत. त्यापैकी २ हजार ७३८ बेड रिकामे असून, यात आॅक्सिजन नसलेल्या बेडची संख्या  १ हजार ७२९ बेड, आॅक्सिजन ९८९ आणि आयसीयू व व्हेंटिलेटरचे २० बेड रिकामे आहेत. पुण्याची वाटचाल चांगल्या दिशेने सुरू असून, पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या खाली येईल तेव्हाच कोरोना संपला असे मानले जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com