राष्ट्रवादीचा गृहमंत्री होतो, तेव्हा अल्पसंख्याकावर अत्याचार होतात : पडळकर 

राज्यात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येते आणि त्यांचा गृहमंत्री होतो, तेव्हा राज्यातील अल्पसंख्याक समाजावर अन्याय अत्याचार होतात. त्यातूनच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ही दुर्दैवी व अमानुष घटना घडली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
When NCP becomes Home Minister, atrocities are committed against minorities: Padalkar :
When NCP becomes Home Minister, atrocities are committed against minorities: Padalkar :

पंढरपूर : राज्यात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येते आणि त्यांचा गृहमंत्री होतो, तेव्हा राज्यातील अल्पसंख्याक समाजावर अन्याय अत्याचार होतात. त्यातूनच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ही दुर्दैवी व अमानुष घटना घडली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

मंगळवेढ्यातील अमानुष मारहाण झालेल्या पिडीत व्यक्तीची पडळकर यांनी भेट घेतली. त्यानंतर पंढरपुरात आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाना साधला. 

या वेळी आमदार पडळकर म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावातील दामाजी बरकडे यांच्या मुलाने आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. त्याचा राग मनात धरुन त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. पिडीत कुंटुंबियाची भेट घेवून त्यांना धीर दिला आहे. पोलिसांशी चर्चा करुन आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मी मागणी केली आहे. 

मागील काही दिवसापूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्याच्या कारणावरुन विराज जगताप व अरविंद बनसोडे या दोन तरुणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. त्यांतरही राज्यात असे हल्ले सुरुच आहेत. राज्यातील अल्पसंख्याक समाज असुरक्षित आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आणि त्यांचा गृहमंत्री झाल्यानंतरच असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. 

गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या पोलिस खात्याची पकड राहिली नाही. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्याचे गृहखाते सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरत असल्याची टाकीही या वेळी आमदार पडळकर यांनी केली.

या वेळी बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, धनगर आरक्षण कृती समितीचे प्रा. सुभाष मस्के आदी उपस्थित होते. 

जातीय रंग न देण्याचे आवाहन 

आंतरजातीय प्रेमविवाहातून जरी हा प्रकार झाला असला तरी याला कोणीही जातीय रंग देऊन जातीय तेढ निर्माण होईल, असे कृत्य करू नये, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. राज्यात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येते आणि त्या पक्षाचा गृहमंत्री होतो, तेव्हा तेव्हा राज्यात अन्याय, अत्याचार वाढतात, अशी खोचक टीकाही पडळकर यांनी केली आहे. 

हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसाला नोकरी 

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात बलिदान देणाऱ्या ४२ जणांच्या कुटुंबातील वारसांना दहा लाख रुपये आणि एसटी महामंडळात नोकरी देण्याच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत संबंधित यंत्रणांना दिले आहेत. याबाबतचा निर्णय मागील भारतीय जतना पक्ष -शिवसेना युतीच्या सरकारने घेतला होता. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. १२) मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन काही विभागाचे निर्णय घेण्यात आले. या वेळी मराठा आरक्षण चळवळीविषयी मंत्रिमंडळाने चर्चा केली. या चर्चेमध्ये मराठा आरक्षण चळवळीत बलिदान दिलेल्या ४२ जणांच्या कुटुंबातील वारसांच्या मदतीबाबत आढावा घेण्यात आला. 

Edited by Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com