महात्मा फुलेंच्या जन्मगावी मुलींसाठी सुसज्ज शाळा; सुप्रिया सुळेंचा पुढाकार

त्यावर येत्या आठवडाभरात निर्णय होईल.
Well-equipped school for girls will be set up in Khanwadi : Supriya Sule
Well-equipped school for girls will be set up in Khanwadi : Supriya Sule

पुणे : ‘‘महात्मा जोतिराव फुले यांचे जन्मस्थळ असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे मुलींची सुसज्ज निवासी शाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तीन एकर गायरान संपादीत करून त्यावर सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) इमारत उभारण्यात येणार आहे. ही शाळा उभारून पूर्ण झाल्यानंतर ती केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालयांसारख्या नामांकित संस्थेकडे चालविण्यास देण्याबाबत चाचपणी करण्यात येत आहे,’’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. (Well-equipped school for girls will be set up in Khanwadi : Supriya Sule)  

खानवडीत उभारण्यात येणाऱ्या शाळेसाठी लागणारी जमीन, इमारत यांसह विविध शैक्षणिक मुद्यांवर पुणे जिल्हा परिषदेने बोलाविलेल्या ऑनलाईन बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीला खासदार सुळे, शिक्षण खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद  ‘डायट’चे अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ शांतीलाल मुथा, विकास गरुड, फरिदा लांबे आदी नामांकीत तज्ज्ञ व अधिकारी सहभागी झाले होते. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद यांनी बैठकीत या शाळेसंदर्भात सविस्तर माहिती दिली. या शाळेसाठी तीन एकर गायरानाची आवश्यकता आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यावर येत्या आठवडाभरात निर्णय होईल, असा विश्वास आहे, असेही सुळे यांनी सांगितले.

खासदार सुळे म्हणाल्या की, खानवडीत मुलींच्या शाळेची इमारत उभारण्यासाठी सामजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातही लवकरच यश मिळेल. या शाळेची इमारत ही नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अशी असेल. महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्मगावी दर्जेदार अशी मुलींची निवासी शाळा सुरु व्हावी, यासाठी आम्ही सर्वजण युद्धपातळीवर पाठपुरावा करीत आहोत. त्यासाठी आवश्यक असणारी जमीन ताब्यात आली की त्यावर इमारत उभारण्याचे कामदेखील लवकरच सुरू होईल. 

खानवडीत शाळा बांधून पूर्ण झाल्यानंतर ती चालविण्यासाठी केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय यांसारख्या नामांकित संस्थांकडे देता येऊ शकेल का, याबाबत चाचपणी करण्यात येत आहे, असेही सुळे यांनी नमूद केले. 

या बैठकीत जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षण कसे दर्जेदार करता येईल याबाबतही चर्चा झाली. यामध्ये शाळांची मानांकन यंत्रणा, ई स्कूल आणि मुख्याध्यापकांसाठी प्रशासकीय प्रशिक्षण या मुद्यांवर सर्वंकष चर्चा करण्यात आली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com