पूर्व हवेलीच्या अप्पर तहसीलदारपदी विजयकुमार चोबे यांची नियुक्ती

पूर्व हवेलीच्याअप्पर तहसीलदार म्हणून विजयकुमार चोबे यांची नियुक्ती करण्यातआली आहे.
vc10f.jpg
vc10f.jpg

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्याचे महसूली क्षेत्रफळ व तहसीलदार कार्यालयावरील कामाचा व्याप लक्षात घेता, विभागीय आयुक्त कार्यालयाने नागरिकांच्या सोईसाठी यापुढील काळात हवेली तालुक्याचे मंडलधिकारी कार्यालयनिहाय विभाजन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने पूर्व  हवेलीमधील वाघोली, थेऊर, उरुळी कांचन व कळस याच पाच मंडलाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रासाठी पुढील 28 आठवड्यासाठी प्रायोगिक तत्वावर स्वतंत्र अप्पर तहसिलदाराची नियुक्ती केली आहे.

पूर्व हवेलीमधील वाघोली, थेऊर, उरुळी कांचन व कळस याच पाच मंडलाधिकारी कार्यालयासाठी प्रायोगिक तत्वावर पुढील २८ आठवड्यासाठी अप्पर तहसीलदार म्हणून विजयकुमार चोबे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने जाहीर केले आहे. हवेलीचे विद्यमान तहसीलदार सुनील कोळी यांच्याकडे कोथरुड, खडकवासला, खेड शिवापूर व हडपसर या पाच मंडलाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील गावातील तहसीलदार म्हणून यापुढील काळात कार्यभार राहणार असल्याचेही विभागीय आयुक्त कार्यालयाने एका आदेशाद्वारे जाहीर केले आहे. 

हवेली तालुक्याचे महसूली क्षेत्रफळ व तहसीलदार कार्यालयावर पडणारा कामाचा व्याप लक्षात घेऊन, आमदार अशोक पवार यांनी सात वर्षापूर्वी हवेली तालुक्याची महसूली कामाच्या हिशोबाने विभाजन करावे, अशी मागणी केली होती. 

चोबे यांच्याकडे पुढील 28 आठवड्याच्यासाठी पूर्व हवेलीतील पाच मंडलाधिकारी कार्यालयाचे अपर तहसीलदार या पदावर  नियुक्ती करण्यात आली आहे. तर हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांच्याकडे कोथरुड, खडकवासला, खेड शिवापूर व हडपसर या पाच मंडलाधिकारी कार्यालयातील कार्यक्षेत्रातील नियमित तहसिलदार म्हणून कार्यभार राहणार असल्याचेही विभागीय आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे. 

हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर म्हणाले की, हवेली तालुक्याचे क्षेत्रफळ, प्रलंबित महसूली प्रकरणे, तहसील कार्यालयातील अपुरी कर्मचा-यांची संख्या इत्यादी कारणांमुळे हवेलीतील नागरिकांना शासकीय कामासाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. हवेली तालुक्याची लोकसंख्या व व्याप लक्षात घेता प्रशासकीय कामकाजात हवेलीतील नागरिकांच्या अडचणी कायम वाढतच गेल्याने येथील नागरिकांनी पूर्व  हवेलीचे महसूली विभाजन करून स्वतंत्र कार्यालयाची मागणी पूर्व  हवेलीमधील नागरीकांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे वारंवार केली होती. यामुळे आमदार पवारांनीही शासनस्तरावर हा विषय उचलून धरला होता. यामुळे थेऊर, उरुळी कांचन, वाघोली व कळस या पाच मंडलाधिकारी कार्यालयासाठी अपर तहसिलदार यांची नेमणूक झाल्याने पूर्व  भागातील जनता समाधानी आहे. 

आमदार अशोक पवार म्हणाले की, हवेली तालुक्याचे क्षेत्रफळ राज्यातील काही जिल्ह्यांपेक्षाही जास्त असल्याने प्रशासनावर कामाचा ताण आहे.त्यातच हवेलीतील पूर्व भागातील वाघोली, उरुळी कांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या गावांमधील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. या भागात प्रशासकीय कामे राबवणेसाठी व नागरिकांच्या प्रश्र्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वंतत्र गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व कायमस्वरुपी तहसिलदार, नायब तहसिलदार या अधिका-यांची गरज आहे. त्यामुळे हवेलीचे महसूली विभाजन करून पूर्व हवेलीचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने स्वतंत्र तहसील कार्यालय पूर्व भागातच असावे, ही मागणी शासनस्तरावर व पालकमंत्री यांच्याकडे केलेली आहे. संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभाग, महसूल विभाग इत्यादी विभागातील कर्मचा-यांची व अधिका-यांची नव्याने पदनियुक्ती होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com