शरद पवार यांनी मनाचा मोठेपणा दाखवल्याने हमाल मापाडींची बैठक पुण्यातच झाली!

हमाल मापाडींच्या प्रश्‍नासंदर्भात डॉ. आढाव यांनी पवार यांना १५ दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. त्यानुसार पवार यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयात आज बैठक आयोजित केली.
veteran social activist dr baba aadhav praises sharad pawar role in hamal mapadi meeting
veteran social activist dr baba aadhav praises sharad pawar role in hamal mapadi meeting

पुणे : हमाल मापाडी प्रश्‍नांबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संवेदनशील भूमिका दाखविली असून या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी तीन मंत्र्यांना एकत्रित आणले. हमाल-मापाडींच्या प्रश्‍नावर पहिल्यांदाच कुणीतरी इतकी संवेदनशील भूमिका घेतली आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

हमाल मापाडींच्या प्रश्‍नासंदर्भात डॉ. आढाव यांनी पवार यांना १५ दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. त्यानुसार पवार यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयात आज बैठक आयोजित केली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत पवार यांनी डॉ. आढाव यांची भूमिका सविस्तरपणे समजून घेत आवश्‍यक तिथे आधिकाऱ्यांना सूचना केल्या तसेच तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती देताना डॉ. आढाव म्हणाले, ‘‘ दिलीप वळसे-पाटील यांनी दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे एका महिन्यात हमाल मापाडी मंडळ स्थापन झाले तर आधिकाऱ्यांची एकाधिकारशाही संपण्यास मदत होऊन कष्टकऱ्यांच्या नव्या पर्वाला सुरवात होईल. पवार यांना १५ दिवसांपूर्वी निवेदन दिले तेव्हा बैठकीसाठी बहुधा मुंबईला जावे लागेल, असे वाटत होते. मात्र, पवार यांनी बैठक पुण्यात होईल, असा निरोप दिला. या बैठकीला तीन-तीन मंत्री आणि संबंधित खात्याचे सर्व वरिष्ठ आधिकारी उपस्थित होते. यातून चांगले काहीतरी घडेल’’

पवार यांनी मनाचा मोठेपणा दाखवत १५ दिवसांच्या आत पुण्यातच बैठक घेऊन सर्व आधिकारी व मंत्र्यांना उपस्थित राहण्यास सांगितले. त्यामुळे हमाल-मापाडींच्या विषयात तातडीने काही चांगले निर्णय होतील, अशी आशा डॉ. आढाव यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांचे स्वयंसेवी संस्थांना आवाहन

मुंबई  : बृहन्मुंबई महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करतांना स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत विशेषत: झोपडपट्टयांमध्ये वॉर्डनिहाय पथक स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात, घरोघर जाऊन तपासणी करताना कोरोनामुक्त मुंबईच्या कामात जिद्दीने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. 

त्यांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना या वॉर्डनिहाय पथकांची नोंदणी करण्याची सूचनाही दिली. स्वयंसेवी संस्थांच्या टीमने घरोघरी जाऊन तपासणी करतांना लक्षणे दिसलेल्या रुग्णांना अधिकृत कोविड उपचार केंद्राकडे पाठवावे. गोल्डन अवरमध्ये पेशंट रुग्णालयात आल्यास आपण त्याला वाचवू शकतो असेही मुख्यमंत्री म्हणाले.  

edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com