वशाटोत्सवात यंदा शरद पवार, संजय राऊत...  - Vashatotsavat This year Sharad Pawar, Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

वशाटोत्सवात यंदा शरद पवार, संजय राऊत... 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

राज्यभरातील बहुजन विचारधारेला मानणाऱ्या तरुणांना एकत्र आणून, त्यांच्या वैचारिक विश्वाला विधायक मार्गाने समृद्ध करण्याचे काम, करण्यासाठी वशाटोत्सवाचे आयोजन गेल्या काही वर्षापासून करण्यात येत असल्याचे नितीन यादव यांनी सांगितले.

पुणे : पुण्यात येत्या शनिवारी वशाटोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन चांदणी लॅान्स, चांदणी चौक येथे शनिवार (ता.२० फेब्रुवारी) रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे.

राज्यभरातील बहुजन विचारधारेला मानणाऱ्या तरुणांना एकत्र आणून, त्यांच्या वैचारिक विश्वाला विधायक मार्गाने समृद्ध करण्याचे काम, करण्यासाठी वशाटोत्सवाचे आयोजन गेल्या काही वर्षापासून करण्यात येत असल्याचे नितीन यादव यांनी सांगितले. वशाटोत्सव म्हणजे काही फक्त मांसाहारी मेजवानीचा कार्यक्रम नाही. तर तो वैचारिक मेजवानीचा कार्यक्रम असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे, यंदाच्या वशाटोत्सवाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाला वेगळे महत्व प्राप्त होणार, असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

अक्कड़ बक्कड़ बंबे बो, डीजल नब्बे पेट्रोल सौ...उर्मिला मातोंडकर यांची फटकेबाजी

वशाटोत्सवाच्या कार्यक्रमाध्ये 'जाचक कृषीकायदे, सरकारची अनास्था, शेतकरी आंदोलनावर देशी विदेशातील सेलिब्रेटींचे सोशल भाष्य, शेतकरी आंदोलन, पुढे काय'? या विषयावर शरद पवार मार्गदर्शन करणार आहे. तर, संजय राऊत 'गल्ली दे दिल्ली सुरु असलेल्या सध्याचा सामना : राजकारणी व पत्रकार या नजरेतून'. या विषयावर आपली भूमीका मांडणार आहेत.

बाळासाहेब थोरात स्वातंत्र्यसैनिकाचा वारसा ते सुसंस्कृत राजकारणी : जडणघडण. या विषयावर संवाद साधणार आहेत. तर धनंजय मुंडे 'विरोधीपक्षनेतेपदाच्या काळातील निवडक अनुभव' या विषयावर मत मांडणार आहेत. तर, जितेंद्र आव्हाड 'बहुजन युवक आणि सोशल मिडिया' विषयी मार्गदर्शन करणार आहेत. 

पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसचे विश्वासघात आंदोलन
 

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आजची परिस्थिती : राजकारण, पत्रकार आणि सोशल मिडीया, या विषयी बोलणार आहेत. राजू परुळेकर 'मिडिया व सोशल मिडियातील द्वंद्व'. रश्मी पुराणिक आणि अभिनेते किरण माने रंगभूमी, सद्य पत्रकारिता व त्यापुढील आव्हाने या विषयावर संवाद साधणार, अल्याने कार्यकर्त्यांसाठी खर्या अर्थाने ही वैचारिक मेजवानी ठरणार आहे. 

यावेळी अप्पासाहेब पवार समाजभूषण पुरस्कार वर्ल्ड बाॅर्डरलेस फाउंडेशन, काश्मीर या संस्थेचे संस्थापक अधिक कदम यांना देण्यात येणार आहे. यावेळी 'संगीत संत तुकाराम' या नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.  

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख