उद्धवजी...आता तरी मातोश्री सोडा, लोकांचे हाल बघा : भेगडे 

कोरोनाबाधितांना मोफत उपचार अशी घोषणा महाआघाडी सरकारने केली होती. त्या घोषणेनंतर कुणाला मोफत उपचार मिळाले, हे या महाआघाडीच्यापदाधिकाऱ्यांनी दाखवून द्यावे.
Uddhavji ... Leave Matoshri for now, look at the condition of the people: Bhegade
Uddhavji ... Leave Matoshri for now, look at the condition of the people: Bhegade

शिक्रापूर (जि. पुणे) : कोरोनासारख्या भीषण महामारीच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून राज्य चालवितात, तर फायद्याची कामे नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते, नेते कोरोनाच्या लढाईत थेट उतरत नाहीत. संपूर्ण राज्य कोरोनात ढकलून जनतेचे हाल करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतातरी मातोश्री सोडावी आणि बाहेर फिरून जनतेचे हाल बघावेत, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरूर तालुक्‍यातील शिक्रापूर येथे भाजप कामगार, उद्योग आघाडी व युवा मोर्चाच्या वतीने मोफत कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन भेगडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी महाआघाडी सरकारवर टिकेची झोड उठविली. 

कोरोनाबाधितांना मोफत उपचार अशी घोषणा महाआघाडी सरकारने केली होती. त्या घोषणेनंतर कुणाला मोफत उपचार मिळाले, हे या महाआघाडीच्या कुणाही पदाधिकाऱ्यांनी दाखवून द्यावे. राज्यात 12 लाख 88 हजार रुग्ण कोरोनाबाधित असताना केवळ नऊ हजार रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळाला आहे.

शिरूरमध्ये तर त्यांच्याच पक्षाचा आमदार असताना ही योजना लागू नसल्याचे पाहून आरोग्य मंत्री टोपे हे चांगलेच संतापले होते. राज्यातील एकाही रुग्णालयात पैशांशिवाय कुणालाही ना दाखल करून घेतले जाते, ना मोफत उपचार मिळतात, अशी परिस्थिती आहे. अशा काळात गरिबांनी एक तर आजारी पडू नये, आजारी पडत असाल तर मरा असेच महाआघाडी सरकारचे धोरण आहे, असा आरोपही भेगडे यांनी केला. 

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शिरूरला अचानक भेट दिली, त्या वेळी महात्मा फुले जनआरोग्य योजना तालुक्‍यात सुरू नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याचे गंभीर वास्तव हे कार्यसम्राट म्हणविणाऱ्या तालुक्‍यातील नेत्यांचे उघड अपयश आहे, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी आमदार अशोक पवार यांच्यावर नामोल्लेख टाळून केली. 

या वेळी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश ताठे, किरण दगडे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमानंतर उपस्थितांना तुळस, कोरपड, गवती चहा आदी आयुर्वेदिक रोपांचे वाटप करण्यात आले. 

या वेळी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, पुण्याचे नगरसेवक किरण दगडे, सरचिटणीस सुदर्शन चौधरी, ऍड. धर्मेंद्र खांडरे, बाळासाहेब चव्हाण, युवा मोर्चोचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, गणेश कुटे, कैलास सोनवणे, पंडित भुजबळ, पंचायत समिती सदस्य शाम गावडे आदी उपस्थित होते. 

कार्यक्रम आयोजक कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब दरेकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहीत खैरे यांनी प्रस्ताविक व स्वागत केले. नितीन गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com