तडीपार गुंडाने केला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा खून

रात्रीची संचारबंदी असताना दोन खून घडल्यामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.
 Two murders in Pune city at midnight .jpg
Two murders in Pune city at midnight .jpg

पुणे : पुण्यात (Pune) गुन्हेगारीचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. फरासखाना पोलिस स्टेशनच्या (Faraskhana Police Station) हद्दीत बुधवारी रात्री दोन खून झाले आहेत. तडीपार असलेल्या गुंड प्रवीण महाजनने (Praveen Mahajan) फरासखाना पोलिस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक समीर सय्यद (वय 48) (Sameer Syed) यांचा खून केला. पोलिसांनी महाजनला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. Two murders in Pune city at midnight

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ मध्यरात्री ही घटना घडली. बंदोबस्त आटोपून समीर सय्यद हे घरी जात होते. समीर सय्यद हे खडक पोलिस (Police) लाईनमध्ये राहायला होते. ते श्रीकृष्ण टॉकीजवळ पोहोचले असता प्रवीण महाजनने त्यांचा खून केला. प्रवीण महाजनने नेमका हा खून का आणि कशासाठी केला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरूनच महाजन याला अटक करण्यात आली आहे. सय्यद यांचा मृतदेह  शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

महाजन हा एक वर्षासाठी तडीपार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहेत. सय्यद आणि प्रविण महाजन यांच्या मध्ये काही वाद होता का किंवा हत्येचे कारण काय आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. प्रवीण महाजन हा तडीपार असूनही हत्यार घेऊन शहराच्या मध्यवस्तीत कसा आला आणि तोपर्यंत पोलिस काय करत होते असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हत्यार घेऊन शहरात येवून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा खुन होत असलेल तर यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत असताना बुधवार पेठेत एका देहविक्री करणाऱ्या महिलेचा खून करण्यात आल्याची घटना घडली. नेमका खून का आणि कशासाठी करण्यात आला, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. सध्या राज्यात कोरोनामुळे रात्रीची संचारबंदी असताना दोन खून घडल्यामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com