पुणे आज ओलांडणार कोरोना रुग्णांचा दोन लाखांचा आकडा? 

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण 9 मार्च 2020 ला पुणे शहरात सापडला होता. त्यामुळे सहा महिन्यांत पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्ण दोन लाखांचा आकडा ओलांडत असल्याचे दिसून येत आहे.
Two lakh corona patients to cross Pune today
Two lakh corona patients to cross Pune today

पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा सोमवारी (ता. 7) दोन लाखांच्या काठावर पोचला आहे. दररोज चार हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडत असल्याने, मंगळवारी (ता. 8) पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा दोन लाखांचा आकडा क्रॉस होणार आहे. जिल्ह्यात सोमवारी 4 हजार 273 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

पुणे जिल्ह्यात सोमवारी रात्रीपर्यंत 1 लाख 97 हजार 286 कोरोना रुग्णांची एकूण संख्या झाली आहे. 

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण 9 मार्च 2020 ला पुणे शहरात सापडला होता. त्यामुळे सहा महिन्यांत पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्ण दोन लाखांचा आकडा ओलांडत असल्याचे दिसून येत आहे. 

पुणे शहरातील 2 हजार 53 रुग्णांचा सोमवारी आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये समावेश आहे. दरम्यान, सोमवारी 76 जणांचा मृत्यू झाला आहे. 

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील 1 हजार 259, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 756, नगरपालिका क्षेत्रात 178 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात 27 रुग्णांचा समावेश आहे. 

गेल्या चोवीस तासांत मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 37 रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 17, जिल्हा परिषद क्षेत्रातील 14, नगरपालिका क्षेत्रातील 6 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही 6 सप्टेंबरच्या रात्री नऊपासून सात सप्टेंबरच्या रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. 

दरम्यान, सोमवारी दिवसभरात 3 हजार 93 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील1 हजार 639, पिंपरी चिंचवडमधील 676, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 552, नगरपालिका क्षेत्रातील 125 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 101 जण आहेत. 

आतापर्यंत दीड लाख रुग्णांची कोरोनावर मात 

एकीकडे नवीन कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली असली तरी उपचारामुळे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यानुसार आतापर्यंत 1 लाख 57 हजार 29 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील 88 हजार 579 जणांचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com