दोन सख्ख्या भावांचा एकाच दिवशी कोरोनामुळे मृत्यू 

दोन्ही भावांना वेगवेगळ्या खासगी दवाखान्यांत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
 Two brothers died of corona on the same day
Two brothers died of corona on the same day

मांडवगण फराटा (जि. पुणे) : शिरूर (Shirur) तालुक्यातील बाभुळसर बुद्रूक येथील शेतकरी कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा (Two brothers) एकाच दिवशी कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विठ्ठल भगवान नागवडे (वय 56) (Vitthal Nagwade) व त्यांचे लहान भाऊ सुभाष भगवान नागवडे (वय 53) (Subhash Nagwade) अशी या दोघा भावांची नावे आहेत.

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पूर्व भागातील अनेक गावांमध्ये, वाड्या वस्त्यांवर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊन अनेकांचा मृत्यूही झाला आहे. 

बाभूळसर बुद्रुक येथील विठ्ठल नागवडे व त्यांचे लहान भाऊ सुभाष नागवडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. दोन्ही भावांना वेगवेगळ्या खासगी दवाखान्यांत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र,  गुरुवार (ता.13 मे) नागवडे कुटुंबातील विठ्ठल यांचा उपचार सुरू असतानाच दौंड तालुक्यातील केडगाव येथील खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या काही तासांतच विठ्ठल यांचे लहान भाऊ सुभाष नागवडे यांचाही मांडवगण फराटा येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच दुर्दैवी मृत्यू झाला. 

अवघ्या दोन तासांच्या अंतराने दोन सख्ख्या भावांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाभुळसर गावातील या दोन प्रगतिशील शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांना धक्का बसला असून गावावर शोककळा पसरली आहे. विठ्ठल व सुभाष नागवडे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुले, मुली, सूना असा परिवार आहे.  

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील नवले मळ्यातील तीन सख्या भावांचा पंधरा दिवसांच्या आतच कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता.

कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर पोपट नवले, सुभाष नवले, विलास नवले या तिघाही भावंडांना शिरूर तालुक्यातील विविध खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, 23 एप्रिल रोजी उपचारादरम्यान थोरले बंधू पोपट नवले (वय 58) यांचे निधन झाले, त्यानंतर चारच दिवसांत म्हणजे 27 एप्रिल रोजी सुभाष नवले (वय 55) या मधव्या भावाचे निधन झाले, तर आज (ता. ६ मे रोजी) धाकटा भाऊ विलास नवले (वय 52 ) यांचे निधन झाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com