जाचकांचे भरणेंशी सूर जुळेनात; छत्रपती कारखान्यात दोनदा होणार मोळी टाकण्याचा कार्यक्रम 

अगोदरच्या नियोजनाप्रमाणे 11 वाजून 05 मिनिटांच्या मुर्हूतावर ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते गळीत हंगामाची सुरवात करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी दिली.
The tone does not match the bharane and jachak; The sugarcane crushing launch program will be held twice at Chhatrapati factory
The tone does not match the bharane and jachak; The sugarcane crushing launch program will be held twice at Chhatrapati factory

वालचंदनगर (जि. पुणे) : शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून राजकारण करणारे साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक हे नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, इंदापूर तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी विशेषतः राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याशी सूर जुळण्याआधीच बिघडतात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

इंदापूर तालुक्‍यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 65 व्या उस गाळप हंगामाचा कार्यक्रम दोन वेगवेगळ्या वेळी करण्यात येणार आहे. कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी दसऱ्याचा मुहूर्त गाठून रविवारी (ता 25 ऑक्‍टोबर) सकाळी 11 वाजून 05 मिनिटांनी मोळी टाकण्याचा कार्यक्रम ठेवला होता.

मात्र, कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळेत अचानक बदल करत रविवारी सकाळी 9 वाजता राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते मोळी टाकण्याचा कार्यक्रम निश्‍चित केला. मात्र, जाचक यांनी त्यास विरोध करत ठरलेल्या वेळेनुसार सकाळी 11 वाजून 05 मिनिटांनी मोळी टाकण्याचा कार्यक्रम करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील या दोन्ही नेत्यांचे सूर जुळण्याआधीच बिघडतात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

याबाबतचे वृत्त असे की, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ विद्यमान संचालक मंडळाच्या हस्ते रविवारी (ता.25) दसऱ्याच्या मुहूर्तावर सकाळी 11 वाजून 05 मिनिटांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाचे नियोजन करून पत्रिकाही तयार करण्यात आली होती. तसेच, फोनवरुन संचालक, सभासद व कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना ही वेळ देण्यात आली होती. मात्र, कोठे माशी शिंकली कोण जाणे. या वेळेत अचानक बदल करण्यात आला. 

नव्या नियोजनानुसार राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता कारखान्याच्या गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगामाची सुरुवात करण्यात येणार आहे. 

दरम्यान, अगोदरच्या नियोजनाप्रमाणे 11 वाजून 05 मिनिटांच्या मुर्हूतावर ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते गळीत हंगामाची सुरवात करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी दिली. या संदर्भात जाचक यांनी सांगितले की, ठरलेल्या नियोजनात अचानक बदल करण्यात आला असला तरीही ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते गळीत हंगामाची मुर्हूतावर सुरुवात करण्यात येणार आहे. 

या संदर्भात छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले की, सकाळी नऊ वाजता राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ होणार आहे. सभासदांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com