मुळशीत रासायनिक कंपनीस आग : तीन महिला कामगारांचा मृत्यू, १३ जणी अडकल्या

आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
Three women workers die in a fire at a chemical company in Mulshi
Three women workers die in a fire at a chemical company in Mulshi

पिरंगुट (जि. पुणे) : मुळशी तालुक्यातील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॅालॅाजिस या रासायनिक कंपनीला आज (ता. ७ जून) दुपारी आग लागली. आगीचा भडका मोठा होता. आगीमुळे कारखान्यात १६ महिला कामगार अडकल्या असून त्यातील तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह मिळाले आहेत. दरम्यान इमारतीबाहेरील कामगारांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे. (Three women workers die in a fire at a chemical company in Mulshi)

उरवडे येथील औद्योगिक परिसरात एसव्हीएस अक्वा नावाची कंपनी असून सध्या या कारखान्यात सॅनिटायझर निर्मितीची केली जात आहे. आज (ता. ७ जून) दुपारच्या सुमारास  कारखान्यास अचानक आग लागली. या कारखान्याच्या आतमध्ये १६ महिला कामगार अडकल्या आहेत, त्यातील तिघींचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत. 

दरम्यान, इमारतीच्या आत नसलेले अन्य काही कामगारांना वाचविण्यात यश मिळाल्याची माहिती आहे. पोलिस व अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. आगीचे प्रमाण प्रचंड असल्याने तासाभराहून अधिक काळ आग आटोक्यात येऊ शकलेली नव्हती. आगीचे प्रमाण मोठे असल्याने कारखान्याच्या आतमध्ये अडकलेल्या महिला कामगारांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. या आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

दरम्यान, या दुर्घटनेबाबत या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. काहीजण आगीत अडकले असल्याचे समजते.

या ठिकाणी मुळशीचे तहसीलदार, पौडचे पोलिस निरीक्षक व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोचले आहेत. आत अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मी स्वतः प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. नागरिकांनी कृपया घाबरुन जाऊ नये, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com