हे आहेत, पुणे जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन  - These are the containment zones in Pune district | Politics Marathi News - Sarkarnama

हे आहेत, पुणे जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

 पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 11 तालुक्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव विचारात घेऊन प्रतिबंधित क्षेत्र ( कंटेन्मेंट झोन) जाहीर करण्यात आले आहेत.

पुणे : ग्रामीण भाग शहराच्या तुलनेत कोरोनाच्या विषाणूंपासून सुरक्षित आहेत. आतापर्यंत राज्यातील 34 जिल्ह्यांमधून 5 टक्के (दोन हजार 15) रुग्ण जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत. मात्र, लातूर, सांगली, कोल्हापूर, जळगाव, नगर आणि नाशिक या सहा जिल्ह्यांमध्ये तेथील महापालिकांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाल्याची निष्कर्ष आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीच्या विश्लेषणातून निघाला. 

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 11 तालुक्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव विचारात घेऊन प्रतिबंधित क्षेत्र ( कंटेन्मेंट झोन) जाहीर करण्यात आले आहेत.तालुका आणि प्रतिबंधित गावांची नावे :

बारामती तालुका 
माळेगाव बुद्रुक, कटफळ, वडगाव निंबाळकर

इंदापूर तालुका 
शिरसोली

हवेली तालुका 
मांजरी खुर्द गावठाण, मांजरी बु., झेड कॉर्नर, महादेवनगर, शिवजन्य सोसायटी- भंडलकरनगर, कदमवाकवस्ती- स्वामी विवेकानंद- कवडीमाळवाडी, लोणीकाळभोर-गावठाण-विश्वराज हॉस्पिटल परिसर, फुरसुंगी-हांडेवाडी, फुरसुंगी -पिसोळी- अंतुलेनगर, वाघोली- केसनंद-जोगेश्वरीरोड- सदगुरुपार्क, पेरणे- लोणीकंद गावठाण, वाघोली- गो-हेवस्ती, फुलमळा, गाडेवस्ती, आजाळवाडी रोडवरील गणेशनगर, गणेशपार्क कावडेवाडी, बकोरी - प्रिस्टीनसिटी फेज-1, किरकटवाडी-कोल्हेवाडी, कोल्हेवाडी (खडकवासला), जे.पी.नगर गोसावी बस्ती (नांदेड), कोंढवे धावडे- ग्रीन कंट्री सोसायटी परिसर, नरहे गोकुळनगर, नवदीप सोसायटी ते देवर्षी कॉम्पलेक्स, कंजावस्ती कृष्णाईनगर, भिलारवाडी, जांभुळवाडी-गावठाण, उरळी कांचन -आश्रमरोड, खानापूर.

शिरूर तालुका 
माळवाडी परिसर (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक आस्थापना वगळून), तळेगांव ढमढेरे गावठाण, शिवतक्रार म्हाळुंगे, कवठे यमाई, टाकळीभीमा

वेल्हा तालुका 
सुरवड, कोदवडी, सोंडे कारला, वडगाव झांजे

दौंड तालुका 
राज्य राखीव बल गट क्र. 5 आणि 7, सीआरपीएफ प्रशिक्षण वसतिगृह नवीन परिसर, दहिटणे, मिरवाडी, नांदुर, खामगांव, गणेशनगर, देवकरमळा, बैलखिळा, डुवेवाडी, मेरी मेमोरियल हायस्कुल गिरीम, दौंड शहर व बिगर नगरपालिका हद, गोपाळवाडी म्हसोबा मंदिर, भोहिटे नगर, गोपाळवाडी एस्सार पेट्रोल पंप, दत्तनगर व जिजामाता शाळा परिसर, लिंगाळी माळवाडी (वेताळनगर), म्हसनरवाडी (जगताप व जगदाळे वस्ती), सोनवडी, पवार वस्ती, दळवीमळा.

खेड तालुका 
राक्षेवाडी, चाकण येथील झित्राईमळा प्रभाग क्रमांक दोन

मावळ तालुका 
माळवाडी, तळेगाव शहर, अहिरवाडी, वेहेरगाव, दहिवली, चांदखेड

पुरंदर तालुका : खोमणे आळी

मुळशी तालुका 
भोईरवाडी येथील मेगापोलीस सिटी इमारत ए- 20, जांबे

आंबेगाव तालुका : साकोरे

 

 

प्रतिबंधित क्षेत्रात 31 मे पर्यंत जिल्ह्यात पुढील बाबी बंद 

 

  1. आंतरराष्ट्रीय हवाई सेवा, सर्व प्रवासी रेल्वे सेवा वाहतूक,
  2. सार्वजनिक बस वाहतूक, मेट्रो रेल्वे सेवा, आतंरजिल्हा आणि आंतरराज्यीय वाहतूक 
  3. शाळा, कॉलेज, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग संस्था बंद राहतील. दुरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण सुविधा सुरू राहील.
  4. सिनेमा हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, खेळ संकुले, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, चित्रपटगृह, बार आणि सभागृह
  5. सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मेळावे.
  6. धार्मिक स्थळे, पूजेची, प्रार्थनेची ठिकाणे नागरिकांसाठी बंद राहतील.  धार्मिक स्थळांवर गर्दी करण्यास मनाई
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख