जेलमध्ये काही त्रास नाही ना झाला...? राज ठाकरेंकडून विचारणा

राजसाहेबांच्या भेटीने आम्हा मनसैनिकांच्या देहात दहा हत्तींचे बळ संचारले आहे.
There was no trouble in jail? Question from Raj Thackeray
There was no trouble in jail? Question from Raj Thackeray

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील महावितरणच्या कार्यालयात वाढीव विजबिलांवरून खळ्ळ खट्याक आंदोलन करणारे आणि त्याप्रकरणी कारावासाची शिक्षा झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज (ता. 29 सप्टेंबर) पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची "कृष्णकुंज'वर जाऊन भेट घेतली.

राज यांनी आपुलकीने चौकशी करत "जेलमध्ये काही त्रास नाही ना झाला,' असे विचारले. तसेच, "जागे राहा, तुमचे भविष्य उज्ज्वल आहे' अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. 

दरम्यान, राजसाहेबांच्या भेटीने आम्हा मनसैनिकांच्या देहात दहा हत्तींचे बळ संचारले आहे. अन्यायाविरोधात लढण्याची ताकद नसानसांत भिनली आहे. महावितरणच्या वाढीव बिलांवरून सुरू केलेले आंदोलन एकाअर्थी यशस्वी झाले आहे.

यापुढेही वाढीव बिले आल्यास किंवा वाढीव बिले भरण्यास नकार देणारांची वीजकनेक्‍शन तोडण्याचा प्रयत्न झाल्यास याहूनही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरूर शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी भेटीनंतर सांगितले. 

मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे जनहित आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुंशात कुटे व मनसे कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे यांनी वीजग्राहकांना वाढीव बिले येत असल्याचा मुद्दा महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर मांडला होता. त्या वेळी अधिकाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली होती. त्यामुळे संतप्त मनसैनिकांनी महावितरणच्या कार्यालयात तोडफोड केली होती. 

शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन या कार्यकर्त्यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी भोगावी लागली होती. नुकताच या कार्यकर्त्यांना जामीन मिळाला. त्यावेळीही राज ठाकरे यांनी दूरध्वनीवरून ख्याली - खुशाली विचारली होती. तसेच, समक्ष भेटण्याचा मनोदयही व्यक्त केला होता. 

त्यानुसार, मनसैनिकांनी मुंबईत कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते नितीन सरदेसाई, मनसेचे प्रदेश सचिव सचिन मोरे उपस्थित होते. 

या धाडसी मनसैनिकांचा ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. "जेलमध्ये काही त्रास नाही ना झाला,' असे आस्थेवाईकपणे त्यांनी विचारले. न्याय मिळत नसेल तिथे कायदा मोडावा लागतो. पर्यायाने कारावास देखील भोगावा लागतो. परंतु यातून झालेल्या त्रासातूनच तुमच्या व्यक्तिमत्वाला झळाळी मिळते. आत्मचरित्राची पाने देखील वाढतात. जनहितासाठी व नवनिर्माणासाठी असेच नेहमी जागे रहा, अशा शब्दांत ठाकरे यांनी मनसैनिकांना प्रेरित केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com