डॅशिंग रुपाली पाटील-ठोंबरेंसाठी कलावंतांची फौज होती मैदानात 

पहिल्यांदाच मनसेने पुणे पदवीधरमध्ये उमेदवार दिल्याने त्याला भरघोस मतांनी विजयी करा, असे भरत जाधव यांनी म्हटले आहे.
डॅशिंग रुपाली पाटील-ठोंबरेंसाठी कलावंतांची फौज होती मैदानात 

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाततील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार ऍड. रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यासाठी मालिका आणि चित्रपट अभिनेते, अभिनेत्री यांची फौज प्रचारात उतरली.

अभिनेता भरत जाधव, संजय नार्वेकर, स्मीता तांबे यांच्यासह मेघा पवार, सायली संजीव आणि रमेश परदेशी या नव्या दमाच्या तरुण कलाकारांनी डॅशिंग रुपालीताईंना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. 

पहिल्यांदाच मनसेने पुणे पदवीधरमध्ये उमेदवार दिल्याने त्याला भरघोस मतांनी विजयी करा, असे भरत जाधव यांनी म्हटले आहे. तर,अभ्यासू आणि हुषार असल्याने रुपालीताई निवडून आल्या पाहिजेत,असे सायलीचे म्हणणे आहे. हक्काची आणि शब्दाचे पक्के असलेल्या तरुण, तडफदार मनसे उमेदवाराला बहूमताने निवडून द्या, असे आवाहन मेघा पवार हिने केले आहे. 

 रुपाली पाटील-ठोंबरे या उमदे, ताकदीचे व्यक्तीमत्व असल्याने पदवीधरांनी आपल्या प्रश्नांसाठी त्यांना विधानपरिषदेवर पाठवावे असे आवाहन तांबे यांनी मतदारांना केले आहे.

आपली ही लाडकी बहीण छोट्या प्रश्नांसाठी तशीही भांडण असते.मात्र, मोठ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तिला संधी मिळणे आवश्‍यक असल्याचे सांगून परदेशी यांनी म्हटले आहे. बदल करण्याची संधी असलेल्या तरुणांनी ही संधी न सोडता बदल घडवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

प्रचाराला सुरवात झाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसात रूपाली पाटील यांनी मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात प्रचाराचा झंझावात निर्माण केला. सर्व जिल्ह्यात प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण करीत निवडणुकीचे वातावरण निर्माण केले.

जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोचण्यासाठी त्यांनी सोशल मिडीयाचा प्रभावी वापर केला. सध्या निवडणूक लढवत असलेल्या सर्व उमेदवारांमध्ये सोशल मिडीयावर सर्वाधिक फॉलोअर असलेल्या रूपाली पाटील या एकमेव उमेदवार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com