विनंती करूनही न ऐकणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा : अजित पवार

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून ऍडमिट करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी आज (ता. 16 ऑगस्ट) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मोठ्या प्रमाणात आल्या. त्याची गंभीर दखल घेत 'संबंधित रुग्णालयाच्या प्रशासनास अगोदर विनंती करा, तरीही विनंती मान्य न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करा,' असा आदेश पवार यांनी दिला.
Take action against hospitals that do not listen to requests: Ajit Pawar
Take action against hospitals that do not listen to requests: Ajit Pawar

बारामती : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून ऍडमिट करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी आज (ता. 16 ऑगस्ट) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मोठ्या प्रमाणात आल्या. त्याची गंभीर दखल घेत "संबंधित रुग्णालयाच्या प्रशासनास अगोदर विनंती करा, तरीही विनंती मान्य न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करा,' असा आदेश पवार यांनी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना दिला. 

कोरोनाच्या रुग्णांना काही दवाखान्यात दाखल करुन घेतले जात नाही, बेड मिळत नाहीत, अशा तक्रारी बारामती येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आल्या होत्या. त्याची दखल घेत अजित पवार यांनी प्रशासनाला वरील आदेश दिले आहेत. कोरोनाच्या रुग्णांना कोणत्याही परिस्थितीत बेड मिळालेच पाहिजेत, असेही अजित पवार यांनी सांगितले. 

रुग्णांची हेळसांड होणार नाही, प्रत्येकाला बेड उपलब्ध होतील, गरजेनुसार ज्यांना ऑक्‍सिजनही गरज आहे, त्यांना तशी सुविधा पुरवावी, गरज असेल तेथे खासगी दवाखान्यातही रुग्ण दाखल करून घ्यायला हवेत. कोणत्याही परिस्थितीत लोकांचा जीव वाचणे गरजेचे आहे, त्यामुळे जे सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा आदेश अजित पवार यांनी प्रशासनाला दिला. सर्व डॉक्‍टरांनी एकत्र बसून रुग्ण व्यवस्थापनाबाबत चर्चा करण्याचेही पवार यांनी नमूद केले. 

अजित पवार यांनी याच बैठकीत बारामती ते मेडद हा रस्ता चौपदरी करण्याचा आदेश दिला. खंडोबा नगर ते आरटीओ ट्रॅकपर्यंत रस्ता चारपदरी करण्याचे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. 

बारामती तालुक्‍यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याअंतर्गत असलेला एक फौजदार नागरिकांशी व्यवस्थित बोलत नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यांनी फोनवरून संबंधित फौजदाराला आपल्या शैलीत समज दिली. लोकांशी व्यवस्थित बोलायलाच हवे, असेही त्यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना सांगितले. 

...अन राज्यपालांनी अतुल बेनकेंकडे बोट केले 

आपटाळे (जि. पुणे) : किल्ले शिवनेरीवर आपण चालत आला आहात. पण, महाराष्ट्राचे कुठचेही मुख्यमंत्री पायऱ्या चढून शिवनेरीवर आले नाहीत? याबाबत आपल्याला काय वाटते की पायी चालत यायला हवे की...? पत्रकारांचा हा प्रश्‍न मध्येच तोडत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी शेजारी उभे असलेल्या आमदार अतुल बेनके यांच्याकडे पाहत "हा प्रश्‍न आपण यांना विचारा,' असे म्हणत उत्तर देणे टाळले. 

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी रविवारी (ता. 16 ऑगस्ट) किल्ले शिवनेरीला (ता. जुन्नर, जि. पुणे) भेट दिली. जुन्नरच्या शासकीय विश्रामगृहात आमदार बेनके यांनी कोश्‍यारी यांचे स्वागत केले. त्यानंतर ते शिवनेरीकडे रवाना झाले.

राज्यपाल कोश्‍यारी यांनी गडाच्या पायथ्यापासून शिवजन्म स्थळपर्यंतचा संपूर्ण प्रवास पायी केला. या बाबत विचारले असता "यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे,' असे कोश्‍यारी यांनी सांगितले. एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या किंवा वयाने ज्येष्ठ होत नाही तर तो मनाने ज्येष्ठ होत असते, असेही ते म्हणाले. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com