'कुठल्याच अपेक्षेने नव्हे, तर कलाकारांच्या हितासाठी राष्ट्रवादीत : सुरेखा पुणेकर

कलाकारांनान्याय द्यावा, म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहे
Sarkarnama (98).jpg
Sarkarnama (98).jpg

शिक्रापूर : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर Surekha Punekar या लवकरच राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ''कुठल्याच अपेक्षेने राष्ट्रवादीत प्रवेश करीत नसून केवळ लॉकडाऊन काळात व नंतर होत असलेल्या सर्वच क्षेत्रातील कलाकारांच्या व्यथा सरकारदरबारी मांडण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस हे योग्य व्यासपीठ असल्याने राष्ट्र्वादीत प्रवेश करीत आहे,'' असे सुरेखा पुणेकर यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.  

देगलूर-बिलोली मतदार संघातील रिक्त जागेसाठी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर इच्छुक होत्या. या जागेसाठी शिवसंग्रामकडूनही त्या इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र या चर्चेला त्यांनी नकार दिला आहे. सुरेखा पुणेकर म्हणाल्या, ''मोहोळ विधानसभा मतदार संघातून २००९ मध्ये मी राष्ट्रवादी कॉग्रेसकडून इच्छुक होते. पण पक्षप्रवेश झाला नव्हता. यावेळी मात्र कुठल्याच अपेक्षेने राष्ट्रवादीत प्रवेश करीत नाही.''

लावणी सम्राज्ञी हातावर बांधणार घड्याळ ; अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
''कार्यक्रमांच्या व्यग्रेतेमुळे त्यावेळी मला राजकीय क्षेत्रात जास्त वेळ देता आला नव्हता. यावेळी मात्र मी पूर्णपणे गांभिर्याने राजकारणाकडे पाहत आहे. गेल्या दोन वर्षात झालेल्या कोवीडच्या कारणाने कलाक्षेत्राची हानी झालेली आहे आणि त्यासाठी फार कुणी राजकीय स्तरावर पाठपूरावा केल्याचे मला अनुभवायला आले नाही.  या कलाकारांचे प्रतिनिधीत्व करावे आणि कला क्षेत्राला व त्यातील प्रत्येक कलाकाराला न्याय द्यावा म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहे,'' असे पुणेकर म्हणाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार  Ajit Pawar यांच्याकडून माझ्या पक्षप्रवेशाला होकार आला असून ठरल्याप्रमाणे माझा पक्षप्रवेश होणार आहे, असे त्यांनी सांगितले.  

माझी विचारधारा राष्ट्रवादी
'शिवसंग्राम'कडे विधानसभेसाठी पाठपूरावा केला होता का या प्रश्नाबद्दल पुणेकर म्हणाल्या की, मी सन २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून मोहोळमधून इच्छुक होते. शरद पवार साहेबांच्या विचारधारा मानणारी आहे. माझी विचारधारा राष्ट्रवादी आणि पवारसाहेब हीच आहे. अन्य  केवळ चर्चा आहेत. 

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com