मुळशीसाठी सुप्रिया सुळेंनी केली अजितदादांकडे ही मागणी 

कोळवणभागातील तीनशे एकर शेतीकरिता मुळा नदीवरून उपसा जलसिंचन योजना करण्यात येणार आहे. त्यासाठीही वाढीव पाण्याची गरज आहे.
Supriya Sule made this demand to Ajit Pawar for Mulshi
Supriya Sule made this demand to Ajit Pawar for Mulshi

पुणे : मुळशी तालुक्‍यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुळशी धरणातून तालुक्‍याला मिळणारे 1.2 टीएमसी पाणी पुरत नाही. त्यामुळे शेती आणि पिण्यासाठी 2 टीएमसी पाणी मिळावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

या वेळी बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष, मुळशी पंचायत समितीचे सभापती रवींद्र कंधारे, बारामती लोकसभा समन्वयक प्रवीण शिंदे उपस्थित होते. या मागणीसाठी रवींद्र कंधारे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. 

मुळशी तालुक्‍यातील नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी शासकीय करारानुसार 1.2 टीएमसी पाणी दिले जाते. वास्तविक गेल्या काही वर्षांत तालुक्‍यात अनेक नवीन मोठे गृहप्रकल्प झाले आहेत. तसेच, मोठे औद्योगिक प्रकल्प, हिंजवडी येथील राजीव गांधी आय. टी. पार्क, शैक्षणिक संस्था वाढत आहेत. 

याशिवाय या तालुक्‍यातून पुणे शहर-चांदणी चौक, पौड-ताम्हिणी हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. भविष्यात आणखी दोन रिंग रोडही जाणार आहेत. याचा विचार करता तालुक्‍याची लोकसंख्या भविष्यात आणखी वाढणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता मुळशी तालुक्‍यातील पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे, असे सुळे यांनी नमूद केले आहे. 

कोळवण खोऱ्यातील तीन बंधाऱ्यांमधील पाणी सध्या या भागासाठी नियोजित आहे. तथापि ते पुरेसे नाही. या भागातील तीनशे एकर शेतीकरिता मुळा नदीवरून उपसा जलसिंचन योजना करण्यात येणार आहे. त्यासाठीही वाढीव पाण्याची गरज आहे. तसेच माले, पौड, कोळवण आणि रिहे खोरे व मुळशी तालुक्‍यातील इतर गावांना पिण्यासाठी व सिंचनासाठीची पाण्याची वाढीव पाण्याची गरज आहे. याचा विचार करून मुळशी तालुक्‍यातील रहिवाशांना व शेतकऱ्यांना 2 टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 


हेही वाचा  : खुद्द राज्यमंत्री भरणे यांनी तपासला नागरिकांचा ताप 

वालचंदनगर (जि. पुणे) ः इंदापूर तालुक्‍यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाचे विविध पातळीवरून प्रयत्न सुरु आहेत. तालुक्‍यात शनिवारपासून (ता. 12 सप्टेंबर) जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. त्या अंतर्गत आता प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. त्याची सुरुवात तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत इंदापूर शहरात करण्यात आली. 

या वेळी राज्यमंत्री भरणे यांनी स्वत: थर्मामीटर हातात घेऊन नागरिकांचा ताप, तर ऑक्‍सीमीटरच्या साहाय्याने रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण तपासले. खुद्द मंत्री महोदय आपली आरोग्य तपासणी करण्यासाठी आलेले पाहून नागरिकांनाही कुतूहल वाटले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com