पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांचा संघर्ष सर्वश्रुत असताना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 'मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे' असे वक्तव्य केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मी उच्च व तंत्र शिक्षण खात्याचा मंत्री असल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी माझी वारंवार चर्चा होते. मी त्यांचा लाडका मंत्री आहे, पण राज्य सरकार आणि त्यांच्यातील वाद सोडवणे ईतका मोठा नेता नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
अक्कड़ बक्कड़ बंबे बो, डीजल नब्बे पेट्रोल सौ...उर्मिला मातोंडकर यांची फटकेबाजी
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीवरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याबाबत सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, "तसा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यामध्ये कोणतेही वाद नाही. लोकशाहीच्या अधिकाराप्रमाणे ते राज्य सरकारला काही पत्र लिहीत असतात आणि राज्य सरकार लोकशाही प्रमाणे त्यांना पत्र लिहून उत्तर देत असते.
वशाटोत्सवात यंदा शरद पवार, संजय राऊत...
मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचा आहे, तर उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणून माझा त्याच्या कायम संवाद आहे. राज्यपालांचा मी लाडका मंत्री आहे. पण राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वाद सोडविण्या इतका मी मोठा राजकीय नेता नाही, असे सामंत यांनी सांगितले.
पूजा चव्हाण प्रकरणावरून सेनेत दोन गट नाहीत
शिवसेना हा उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे त्यांचा आदेश शिवसैनिक किंवा मंत्र्याला मान्यच करावा लागतो. पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेमध्ये कोणतेही गट नाहीत, जो आदेश देईल तो मान्य करावाच लागेल. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरे, पोलीस महासंचालकांच्या पातळीवर माहिती घेतली जात आहे, त्यामुळे आपल्याच सहकार्याबद्दल काहीतरी बोलणे योग्य नाही. राठोड समोर येऊन जनतेशी बोलतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
Edited By - Amol Jaybhaye

