नीलम गोऱ्हेंनी फोन करताच बिलासाठी अडवून ठेवलेला मृतदेह मिळाला नातेवाइकांना 

तरीही हे रुग्णालय दोन लाखांची मागणी करीत होते.
As soon as Neelam Gorhe called, the hospital handed over the body of a woman suffering from corona
As soon as Neelam Gorhe called, the hospital handed over the body of a woman suffering from corona

कोरेगाव भीमा (जि. पुणे) : पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित (corona infected ) मायलेकावर उपचार सुरू असताना आईचा मृत्यू झाला. मात्र तिच्यावर अंत्यसंस्कार कोणी करायचे, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते पुढे आले. मात्र, रुग्णालयाने बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्याने मोठी अडचण निर्माण झाली. याबाबतची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांना समजताच त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी तातडीने स्वत: संपर्क साधला आणि मृतदेह ताब्यात मिळाल्यामुळे त्या गरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. (As soon as Neelam Gorhe called, the hospital handed over the body of a woman suffering from corona)

पुण्यात मंगळवारी (ता. ११ मे) एका महिलेचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचा कोरोनाबाधित मुलगाही रूग्णालयात उपचार घेत असून महिलेसोबत फक्त त्यांची मुलगीच रुग्णालयात होती. अशावेळी पुढील सोपस्कार व अंत्यसंस्काराच्या मदतीसाठी संबंधितांकडून पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांना विचारणा झाली. त्यांनी तत्काळ होकार देत सागर धामंदे व रमेश घोडेराव यांना मदतीला घेत रुग्णालय गाठून त्यांच्या मुलीला धीर दिला. तसेच, कागदपत्रांच्या पूर्ततेचे काम सुरु केले.

मात्र, त्यावेळी रुग्णालय प्रशासन उर्वरित बिलासाठी अडून बसले. त्यावर कट्यारमल यांनी व्यवस्थापनातील प्रमुख डाॅक्टर्सची भेट घेऊन सर्व परिस्थिती समजून सांगितली. आधीच कसेबसे तीन लाख रुपये भरले होते. तसेच, जवळपास अडीच लाखांची इंजेक्शन्सही दिली. तरीही हे रुग्णालय दोन लाखांची मागणी करीत होते. त्या मुलीने एवढे पैसे नाहीत तसेच भावावरही रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगूनही रुग्णालय प्रशासन ऐकायला तयार नव्हते. 

पवन कट्यारमल यांनी बाब विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याशी संपर्क साधून सांगितली. त्यांनी त्वरित याची दखल घेत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधत बिलात सवलत देत सहकार्य करण्यास सांगितले. त्यानंतर वेगात चक्रे हलली अन्‌ तत्काळ अॅम्बुलन्ससह सर्व सुविधा उपलब्ध करून मृतदेह ताब्यात देण्यात आला, असे पवन कट्यारमल यांनी सांगितले.

या दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी स्वत: पवन कट्यारमल व रुग्णालयाशी संपर्क साधून आणखी काही अडचण आहे का? याची सातत्याने विचारणाही केली. कोरोना संकटाच्या या प्रसंगात अनेकवेळा जवळचे नातेवाईकही मदतीला येत नसल्याची उदहारणे आहेत. परंतु अडचणीत असलेल्या या कुटुंबाला मात्र ऐनवेळी सामाजिक कार्यकर्ते पवन कट्यारमल यांच्या संपर्कामुळे संवेदनशील व्यक्तिमत्वाच्या नीलम गोऱ्हे यांची मदत मिळाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com