रणांगणात उतरण्याआधीच भाजपला धक्का...पॅनेलप्रमुखच अपात्र 

दिलीप खैरे यांचा अर्ज बाद झाल्यानेभाजपला धक्का बसला आहे.
sf24.jpg
sf24.jpg

सोमेश्वरनगर (पुणे) : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीत तब्बल ९४ इच्छुकांचे अर्ज बाद ठरले. 'पाच वर्षांपैकी किमान तीन वर्ष ऊस आला नाही' या नियमाची कुऱ्हाड बहुतांश उमेदवारांवर कोसळली आहे. भाजपचे नेते दिलीप खैरे यांचा अर्ज बाद झाल्याने खळबळ उडाली असून पॅनेलप्रमुखच अपात्र ठरल्याने रणांगणात उतरण्याआधीच भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे.
 
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत ६३२ अर्जांची छाननी झाली. यामध्ये ९७ अर्ज सुरवातीला बाद ठरवण्यात आले होते. परंतु दुपारनंतर झालेल्या सुनावणीत माजी संचालक श्रीरंग साळवेंसह एकूण तीन जणांचे अर्ज पुन्हा पात्र ठरले. अपात्र अर्जांचा आकडा ९४ तर पात्र अर्ज ५३८ झाले. दिलीप खैरे यांच्यासह माजी संचालक विक्रम काकडे, माजी संचालिका मानसी शरद जगताप, नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे, अनिल चव्हाण, संभाजी घाडगे, धनाजी अहिरेकर, संभाजी साळुंके, दत्तात्रेय धायगुडे, दत्तात्रेय तांबे, सच्चिदानंद माने, विजय हिरवे, अमर होळकर आदींचे अर्ज बाद ठरले

 सहकार कायद्याच्या ९७ व्या घटनादुरूस्तीच्या अनुषंगाने कारखान्याने केलेल्या पोटनियमानुसार २०१५-१६ ते २०१९-२० या पाचपैकी तीन वर्ष ऊस येणे अपेक्षित होते. या नियमात न बसल्याने बहुतांश अर्ज बाद झाले. याशिवाय सहकारी संस्थेची थकबाकी, सूचक-अनुमोदकांची थकबाकी अशा नियमांतून अन्य अर्ज बाद झाले. 

दुपारी सुनावणीत भाजपचे नेते दिलीप खैरे, अॅड. सुमित खैरे, अॅड. जी. बी. गावडे यांनी बाजू मांडली. मतदार यादी एप्रिल २०१८ पर्यंतची असून निवडणूक फेब्रुवारी २०२० मध्येच स्थगित झाली होती. त्याच टप्प्यावरून पुढे कार्यक्रम जाहीर झाला आहे. मतदारयादीत बदल झालेला नसल्याने सन २०१४-१५ ते २०१८-१९ या पाच वर्षांपैकी तीन वर्ष ऊस यावा हा नियम धरून अर्ज पात्र करावेत, अशी आग्रही मागणी केली. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी कारखान्याने कायद्यास अनुसरून केलेल्या पोटनियमाचा आधार घेत त्यांचा अर्ज फेटाळला. यानुसार जिराईत भागातील व राखीव गटातील शेतकऱ्यांचे जास्त संख्येने अर्ज फेटाळले गेले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com