अजित पवारांची सत्ता असलेल्या बॅंकेत किरीट सोमय्या धडकले

सोमय्या हे सुमारे पाऊण तास जिल्हा बॅंकेत थांबले होते.
Somaiya took information from Pune District Bank about loan given to Jarandeshwar factory
Somaiya took information from Pune District Bank about loan given to Jarandeshwar factory

पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरुवारी (ता. ९ सप्टेंबर) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून जरंडेश्‍वर साखर कारखाना कर्ज वाटप प्रकरणाची माहिती घेतली. या माहितीसाठी सोमय्या हे सुमारे पाऊण तास जिल्हा बॅंकेत थांबले होते. त्यावेळी त्यांनी बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या कर्ज वितरणाची आणि कर्ज वाटप नियमावलीबाबतची माहिती घेतली. (Somaiya took information from Pune District Bank about loan given to Jarandeshwar factory)  

पुणे श्रमिक पत्रकार संघातील पत्रकार परिषद संपल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास माजी खासदार सोमय्या हे पुणे जिल्हा बॅंकेत पोचले. तेथे त्यांनी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांची भेट घेऊन, या कर्ज प्रकरणाची माहिती देण्याची मागणी केल्याचे बॅंकेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. जिल्हा बॅंकेच्या वतीने साखर तारणावर कारखान्यांना कर्ज वितरित केले जाते. त्यानुसार जिल्हा बॅंकेने जरंडेश्‍वरला हे कर्ज वाटप केले आहे. परंतु हे वाटप नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे.

दरम्यान, दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना ‘जरंडेश्वर साखर कारखाना ६५ कोटींमध्ये लिलावाद्वारे घेण्यात आला. पुणे जिल्हा सहकारी बॅंकेसह इतर बॅंकांनी या कारखान्याला सातशे कोटींचे कर्ज कसे दिले. कारण, तेवढे कर्ज घेण्यासाठी कारखान्याचे किमान एक हजार कोटींचे मूल्यांकन असायला हवे. हिंमत असेल तर अजित पवार यांनी कारखान्याच्या व्हॅलुएशनची कागदपत्रे समोर ठेवावीत, असे आव्हान सोमय्या यांनी दिले. ते म्हणाले की, काही दिवसांत कारखान्याची ४२ कोटींची जमीन एनएचएआयने आणि त्यानंतर महावितरणने २२ कोटींची जमीन अधिगृहीत केली. पुणे जिल्हा सहकारी बॅंकेसह इतर बॅंकांचे सातशे कोटींचे कर्ज घेतले. तेवढे कर्ज घेण्यासाठी कारखान्याचे किमान एक हजार कोटींचे मूल्यांकन असायला हवे. 

किरीट सोमय्या म्हणाले की, मी जिवाला घाबरत नाही. पण, ज्यांनी गैरव्यवहार केले त्यांना घाबरण्याची गरज काय? बारामतीला गणेश विसर्जनानंतर जाणार आहे. विसर्जनाची प्रक्रिया बारामतीपासून सुरू करणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com