मोहितेंना माजी आमदार करण्याची व्यवस्था शिवसेना पुढच्या निवडणुकीत नक्की करेल 

खेड पंचायत समितीचा विषय आम्ही प्रतिष्ठेचा केलेला आहे.
Shiv Sena will be the candidate in Khed in the upcoming elections : Sanjay Raut
Shiv Sena will be the candidate in Khed in the upcoming elections : Sanjay Raut

पुणे :  आमदार दिलीप मोहिते यांची वागण्याची तऱ्हा अशीच (कुरघोडीचे राजकारण) असेल तर आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी असो अथवा नसो, खेड मतदारसंघात शिवसेनेचा विधानसभेचा उमेदवार राहील. येथील विद्यमान आमदार दिलीप मोहिते माजी होतील. येथून शिवसेना आमदार निवडून येईल, अशी व्यवस्था आम्हाला करणे सोपे आहे, ते आम्ही करू, असे सांगून विधानसभेच्या आगामी निवडणुकीत खेडमध्ये शिवसेनेचा उमेदवार असेल असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. (Shiv Sena will be the candidate in Khed in the upcoming elections : Sanjay Raut)

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधातील शिवसेनेच्या सदस्यांनी बंडखोरी करत अविश्वास ठराव आणला होता. त्या बंडामागे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. त्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी खासदार राऊत हे आज (ता. ४ जून) राजगुरुनगर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. 

खासदार राऊत म्हणाले की, खेड पंचायत समितीचा विषय आम्ही प्रतिष्ठेचा केलेला आहे. आम्हालाही माणसं फोडता येतात. पण, एकदा आपण नियमानं बांधलो गेलो आहोत, त्यामुळे आम्ही तसं करणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच आमची शरद पवार यांच्यावरसुद्धा श्रद्धा आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत अगोदर जाऊ. त्यानंतर आम्हाला काय करायचं ते आम्ही पाहू. 

आमदार दिलीप मोहिते यांची वागण्याची तऱ्हा अशीच असेल, तर पुढच्या निवडणुकीत महाविकास आघाडी असो किंवा नसो, खेड मतदारसंघात शिवसेनेचा विधानसभेचा उमेदवार राहील आणि विद्यमान आमदार माजी होतील. येथे शिवसेना आमदार निवडून येईल, अशी व्यवस्था आम्हाला करणे सोपे आहे, ते आम्ही करू. जर तुम्ही अशा खुनशी पद्धतीने राजकारणात काम करत असाल तर ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही, असेही त्यांनी आमदार मोहिते यांना सुनावले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सकाळी चर्चा करून मी येथे आलो आहे. त्यांच्या सूचनेनुसार हे मत मी मांडतो आहे. राज्यात सरकार व्यवस्थित चालले असताना पुणे जिल्ह्यात अशा प्रकारच्या कुरघोडी करणारे लोक आहेत. त्यांचा बंदोबस्त पालकमंत्री अजितदादा पवार यांनी तत्काळ करावा. अजितदादा पवार यांचे हे आमदार ऐकत नसतील तर मग त्यांनी शिवसेनेला मुभा द्यावी. खेडपुरतं आणि पुणे जिल्हापुरंत काय करायचं ते आम्ही बघू. जो संघर्ष आम्ही टाळत आलोय, तो संघर्ष आम्हाला नकोय.

जी अपेक्षा आमची, तीच राष्ट्रवादी, काँग्रेसची आहे

शिवसेना-युतीच्या काळातही भांड्याला भांडं लागायचं. पण, आमच्यात एक अलिखित करार होता की एकमेकांची माणसं पळवून आणि फोडून सत्ता स्थापन करायची नाही. असा प्रसंग निर्माण होईल, तेव्हा एकमेकांना त्या संदर्भात माहिती देऊन चर्चा करायची, असा हा अलिखित करार आम्ही युती असेपर्यंत पाळला. जशी आमची अपेक्षा आहे. तशीच आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाची आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com