'आय लव यु कचरा,' म्हणत शिवसेनेचं अनोखे आंदोलन

'आय लव यु कचरा,' 'आय लव यु खड्डा' असे फलक यावेळी आंदोलकांच्या हातात होते.
Sarkarnama - 2021-09-13T143458.894.jpg
Sarkarnama - 2021-09-13T143458.894.jpg

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात पडलेल्या खड्यांबाबत शिवसेनेचे Shiv Sena माजी आमदार महादेव बाबर Mahadev Babar यांनी अनोखे आंदोलन केलं. स्थानिक नगरसेवकांनी गेल्या चार वर्षात परिसरात कुठलेही काम केले नाही, असा आरोप करुन महादेव बाबर म्हणाले की, महापालिका, स्थानिक नगरसेवकांच लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
 
महादेव बाबर म्हणाले की, कोंढवा परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत, हे खड्डे बुजवले जात नाहीत. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. मोठे खड्डे पडल्याने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना अपघाताला सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर या परिसरात कचरा मोठ्या प्रमाणावर  जमा झालेला आहे. हा कचरा उचलला जात नाही तो कचरा पालिकेने लवकर उचलावा. 

'आय लव यु कचरा,' 'आय लव यु खड्डा' असे फलक यावेळी आंदोलकांच्या हातात होते. यावेळी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  ''मुबलक पाणी केव्हा मिळणार'' ''पुढे खड्डा आहे वाहने सावकाश चालवा -संकल्पना नगरसेवक, " अशी अनोखे पोस्टर घेत महानगरपालिका व नगरसेवकांचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी प्रसाद बाबर, तानाजी लोणकर उपस्थित होते.

पुणे लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे देण्याचा प्लॅन ; कॉग्रेस नेत्याचा आरोप
पुणे : पुणे शहर कॉग्रेसच्या अध्यक्षांना पक्षाच्या एका नगरसेवकाने पाठविलेल्या पत्रामुळे कॉग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.  या पत्रात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पुणे लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉग्रेसला NCP सोडण्याचा प्लॅन सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. पक्षाची गोपनीय माहिती भाजपला पुरविली जात असल्याचा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आला आहे. शहराध्यक्ष रमेश बागवे Ramesh Bagwe यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com