राष्ट्रवादीविरोधात शिवसेना आक्रमक; खेड पंचायत समिती इमारतीवरून आंदोलन 

सर्व रितसर प्रक्रिया होऊनसुद्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या बांधकामात हलगर्जीपणा करत आहेत.
Shiv Sena aggressive against NCP; Agitation on Khed Panchayat Samiti building
Shiv Sena aggressive against NCP; Agitation on Khed Panchayat Samiti building

राजगुरुनगर (जि. पुणे) : खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीवरून सुरू असलेला आमदार दिलीप मोहिते आणि माजी आमदार सुरेश गोरे, तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामधील वाद अधिकच चिघळत चालला आहे. या वादाची पुढची पायरी म्हणजे शिवसेना उद्या शुक्रवारी (ता. 18 सप्टेंबर) जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणार आहे. 

सर्व रितसर प्रक्रिया होऊनसुद्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या बांधकामात हलगर्जीपणा करत आहेत. या कारणावरून त्यांच्याविरोधात शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य, खेड पंचायत समितीचे पदाधिकारी आंदोलन करणार आहेत. त्याबाबतचे पत्र शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनास दिले आहे. 

खेड पंचायत समितीची नवीन इमारत पंचायत समिती समोरच्या जिल्हा परिषदेच्या जागेत मंजूर झाली. निविदा प्रक्रिया होऊन ठेकेदार निश्‍चित झाला आणि त्याला कार्यादेशही देण्यात आला आहे. तसेच, त्या ठिकाणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. 

मात्र, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोहिते निवडून आले. त्यानंतर त्यांनी ही मंजूर इमारत याठिकाणी न बांधता, त्या ठिकाणी खेड तालुक्‍यातील सर्व कार्यालयासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधण्याची भूमिका घेतली. त्यामुळे नवीन इमारतीचे काम सुरूच झालेले नाही. 

दरम्यान, शिवसेनेच्या नेत्यांनी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तारांशी संपर्क केला. सत्तारांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. तरीही काम सुरू झालेले नसल्याने शुक्रवारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य व खेड पंचायत समितीचे सदस्य आंदोलन करणार आहेत. 

या मंजूर इमारतीची जागा प्रशासकीय कार्यालयांची इमारत बांधण्यासाठी, जिल्हा परिषदेने महसूल विभागला द्यावी, असा ठराव बांधकाम समितीत घेण्यात आला आहे. त्यानंतर तो स्थायी समितीच्या मासिक सभेत ठेवण्यात आला. 

स्थायी समितीत या ठरावास काही सदस्यांनी विरोध केला आहे. असा ठराव करणे, जिल्हा परिषदेच्या न्याय्य हक्कांना बाधा आणण्यासारखे आहे, असे शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर यांनी आंदोलनाबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com