शिवाजीराव भोसले बॅंक फसवणुकीच्या तक्रारींवर उद्या निवारण

आर्थिक फसवणूक, जमिन घोटाळे, महसूली फसवणूक तक्रारी केंद्रस्थानी ठेवूनतक्रार निवारण दिन आयोजित केला आहे.
Sarkarnama (74).jpg
Sarkarnama (74).jpg

शिक्रापूर : गेल्या पाच महिन्यांपासून शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेशी Shivajirao Bhosale Bank संबंधित कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीमुळे शिक्रापूर पोलिस ठाणे चर्चेत आले. या शिक्रापुर पोलिस ठाण्यात उद्या तक्रारदार मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित सर्व तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.   

विविध प्रकारच्या आर्थिक फसवणूक, पुनर्वसन जमिन घोटाळे, महसूली फसवणूकी याला केंद्रस्थानी ठेवून आम्ही तक्रार निवारण दिन आयोजित केला असून ४९५ तक्रारींसह नव्याने येणा-या सर्व तक्रारींचा निपटारा संपूर्ण दिवसभर केला जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

ईडीला उच्च न्यायालयाचा दणका..सरनाईकांच्या संबधित याचिका फेटाळली  
शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेशी संबंधित कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याच्या निमित्ताने शिक्रापूरातील एक नेता गजाआड गेल्यानंतर शिक्रापूर पोलिस ठाणे चर्चेत आले. याच अनुषंगाने अनेक तक्रारी दाखल आहेत. या शिवाय अशाच पध्दतीने पुनर्वसन जमिनी खरेदी-विक्रीतही अनेक तक्रारी शिक्रापूर पोलिसांकडे प्राप्त आहेत, मात्र त्यावर निर्णय झालेला आहे. पर्यायाने या सर्वांवर ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यामध्ये दाखल होऊ शकतील, अशा ४२२ तक्रारी अर्ज वरिष्ठ कार्यालयाकडे प्राप्त आहेत. तर पोलिस ठाण्याच्या पातळीवर २२ तक्रारी अर्ज प्राप्त आहेत. या शिवाय उद्याच्या मेळाव्यात जेवढे अर्ज येतील त्यावर तत्काळ कार्यवाही करुन गुन्हे दाखल करणे शक्य होणार असल्याचेही शेडगे यांनी सांगितले. 

गेल्या पाच वर्षात सुमारे १००० एवढा तिप्पट गुन्हे दर झालेले पुणे जिल्ह्यातील हॉट पोलिस ठाणे म्हणून शिक्रापूर पोलिस स्टेशनची ओळख आहे. येथे फसवणूक, महिला छेडछाड, विनयभंग, घरफोडी, औद्योगिक दहशत, खंडणी अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे मोठे प्रमाण आहे. या शिवाय महसूली प्रकारचे, जमिन खरेदी-विक्रीच्या संबंधित, पुनर्वसन जमिन खरेदी-विक्री आदींच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात गुन्हे होतात. याच अनुषंगाने अनेकांच्या अर्जावर कार्यवाही झाली नसल्याने या सर्व अर्जांसह वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने कुणाचे काही नव्याने अर्ज असतील त्यावर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने तक्रारदार-मेळावा शिक्रापूर पोलिसांनी आयोजित केला आहे. 

येथील गजानन मंगल कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी चार पर्यंत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या सुचनेनुसार हा मेळावा आयोजित करण्यात येत असल्याचे शेडहे यांनी सांगितले.  नागरिकांनी आपापले जुने अर्ज, नवे अर्ज घेऊन येथील गजानन मंगल कार्यालय (पाबळ चौक, पुणे- नगर महामार्ग, शिक्रापूर) येथे हजर राहावे, असे आवाहन पोलिस निरिक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ९९२३६०००१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com