गणेशोत्सवात पुण्यात जमावबंदी नाही ;  अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

नव्याने लागू केलेल्या जमावाबंदीचा निर्णय नाही. काही ज्वलनशील पदार्थांच्या बाबत हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी केले आहे.
Sarkarnama (81).jpg
Sarkarnama (81).jpg

पुणे : यंदा गणेशोत्सवावर (Ganeshotsav Celebration)  वर सलग दुसर्‍या वर्षी कोरोनाचं सावट आहे.  पुणे शहरामध्ये यंदा गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) ते अनंत चतुर्दशी (Ananat Chaturdashi)  म्हणजेच 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या दहा दिवसांच्या कालावधी साठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात पुण्यात कलम 144 लागू करण्याचे आदेश आहेत, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण हा नव्याने लागू केलेल्या जमावाबंदीचा निर्णय नाही. काही ज्वलनशील पदार्थांच्या बाबत हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण  पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिले आहे. 

राज्य सरकारच्या नियमावली नुसार पूर्वीप्रमाणे अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन आहे.  प्रार्थनास्थळं बंद ठेवली जाणार आहेत. या काळात पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावं, असं आवाहन पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केलं आहे.  

सचिन वाझेने मुख्यमंत्र्यापासून सत्य लपविलं! 
यंदा देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तर गणपती मूर्ती घरगुती उत्सवासाठी 2 फूट, सार्वजनिक उत्सवासाठी 4 फूट असणार आहे. गणपतीच्या आगमन, विसर्जन मिरवणूकांवर बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन देखील शक्य असल्यास घरात, नजिकच्या कृत्रिम तलावांमध्ये करण्याचं आवाहन आहे. यामुळे अनावश्यक गर्दी रोखून कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.

वारकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
मुंबई : महाराष्ट्र सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग व वारकरी साहित्य परिषद Warkari Sahitya Parishad यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या विधान भवनात आयोजित बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये वारकऱ्यांना पाच हजार रुपये मानधन मिळावे, ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ व्हावी आणि राज्यात भव्य संतपीठ उभे राहावे, या प्रमुख मागण्या वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी मान्य केल्या आहेत. वारकरी साहित्य परिषदेच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख Amit Deshmukh यांनी केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com