मोठी बातमी : गणेशोत्सवात उद्यापासून जमावबंदी

नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
2dj_with_ganpatil_final.jpg
2dj_with_ganpatil_final.jpg

पुणे :  गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातल्या  pune बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या ganeshotsav काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून जमावबंदी लागू करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.

पुण्यात कलम १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी, प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यास, तसेच संचार करण्यास मनाईचे आदेशही लागू केले आहेत.

पुढचे दहा दिवस (10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर) हे आदेश लागू राहणार असून याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पुणे पोलिस सहाय्यक आयुक्त डॉ. शिसवे यांनी दिला. या काळात पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावं, असं आवाहन पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केलं आहे.

या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ७ हजार पोलिस तैनात केले जाणार आहेत. पुण्यात आज गणरायाच्या आगमनासाठी खरेदीसाठी नागरिक बाहेर पडल्याने गर्दी झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी झाली आहे. 


वारकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
मुंबई : महाराष्ट्र सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग व वारकरी साहित्य परिषद Warkari Sahitya Parishad यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या विधान भवनात आयोजित बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये वारकऱ्यांना पाच हजार रुपये मानधन मिळावे, ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ व्हावी आणि राज्यात भव्य संतपीठ उभे राहावे, या प्रमुख मागण्या वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी मान्य केल्या आहेत. वारकरी साहित्य परिषदेच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख Amit Deshmukhयांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com