अखेर संभाजीराजे व उदयनराजे भेटणार   - Sambhaji Raje and Udayan Raje will meet in Pune today  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

अखेर संभाजीराजे व उदयनराजे भेटणार  

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 14 जून 2021

खासदार उदयनराजे म्हणाले होते, संभाजीराजे माझे भाऊ आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत मी त्यांच्यासमवेत आहे.

पुणे : मराठा आरक्षण प्रश्नी कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांची भेट घेणार आहेत. ही भेट सोमवारी (ता.१४ जून) दुपारी पुणे येथे होणार आहे.  (Sambhaji Raje and Udayan Raje will meet in Pune today)

कोल्हापूर येथे भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी त्यांनी या आंदोलनासाठी आपण साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचीही भेट घेणार असे नमुद केले होते. त्यामुळे संभाजीराजे व उदयनराजेंच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हे ही वाचा : जळगावमध्ये संजय राऊतांच्या विधानाची ठिणगी!

या दोन नेत्यांची पुण्यात या आधीच भेट होणार होती मात्र, काही कारणास्तव खासदार उदयनराजे भोसले पुण्यात पोहचू शकले नव्हते. त्यामुळे त्यांची भेट कधी होणार याविषयीची उत्सुकता ताणली होती. मात्र, आज त्यांची भेट होणार आहे. खासदार उदयनराजे म्हणाले होते, संभाजीराजे माझे भाऊ आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत मी त्यांच्यासमवेत आहे. येत्या दोन चार दिवसांत आमची भेट होईल. या भेटीनंतर आम्ही आरक्षण आंदोलनाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे ते म्हणाले होते. 

हे ही वाचा : बीड जिल्ह्यात येणारा विकास निधी गावांपर्यंत जात नाही; क्षीरसागरांची ठाकरेंकडे तक्रार...

मराठा आरक्षणावर पुन्हा16 जूनला आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे. त्यावर उदयनराजे म्हणाले होते दुर्देवी गोष्ट आहे आंदोलन करण्याची वेळ येत आहे. 

कोणत्याही परिस्थितीत सर्वांना एकत्र घेऊन राज्य कारभार चालला पाहिजे असे मी नेहमी सांगत असतो. मग सत्ता कोणाचीही असो. कोणाचेही आरक्षण काढून अन्य कोणाला देऊ नका. मराठा समाजावर भेदभाव करु नका. त्यांचा देखील अधिकार आहे त्यावर. गायकवाड आयोगाने सविस्तर दिले असताना ते का टाळले जात आहे. त्याचे व्यवस्थित वाचन झाल नाही. झाल असते तर सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचने नकारात्मक निकाल दिला नसता.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख