शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी : साहित्य संमेलन व 'वशाटोत्सव' रद्द करा... - Sambhaji Brigade demands cancellation of Sahitya Sammelan and Vashatotsav | Politics Marathi News - Sarkarnama

शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी : साहित्य संमेलन व 'वशाटोत्सव' रद्द करा...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

राज्यात शिवजयंतीचे हजारो कार्यक्रम होत असतात. शिवप्रेमी कार्यकर्ते शिवजयंतीच्या निमित्ताने गावागावात व्याख्यान, पोवाडे, स्पर्धा, प्रबोधन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.

पुणे : राज्यात शिवजयंतीचे हजारो कार्यक्रम होत असतात. शिवप्रेमी कार्यकर्ते शिवजयंतीच्या निमित्ताने गावागावात व्याख्यान, पोवाडे, स्पर्धा, प्रबोधन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. कार्यक्रम पत्रिकेपासून सभागृह आणि वाक्त्याच्या मानधना पर्यंत सगळे ठरलेले असताना सरकारने अचानक शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याचा आदेश काढला. त्यामुळे हजारो शिवप्रेमींचे लाखो रुपये पाण्यात गेले. हा शिवद्रोही सरकारचा दुर्दैवी निर्णय असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. 

नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ स्वागताध्यक्ष आहेत. कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रद्द करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. शिवजयंती साजरी करणाऱ्या शिवप्रेमींना राज्य सरकार पोलिसांकडून त्रास देत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केला आहे. 

अक्कड़ बक्कड़ बंबे बो, डीजल नब्बे पेट्रोल सौ...उर्मिला मातोंडकर यांची फटकेबाजी

साहित्य संमेलनाचा ५० लाख रुपये अनुदान राज्यातील जनतेच्या आरोग्यावर खर्च करावे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत होणारा, चांदणी चौकातील शनिवार (ता.२० फेब्रुवारी) रोजीचा १००० लोकांचा 'वशाटोत्सव' सुद्धा राज्य सरकार व पुणे पोलिसांनी रद्द करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

वशाटोत्सवात यंदा शरद पवार, संजय राऊत...
 

कारण या ठिकाणी सुद्धा हजारो लोक जमणार आहेत. जर शिवजयंती उत्सवाचे राज्यातील कार्यक्रम रद्द होत असतील तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व वशाटोत्सव आणि इतर कार्यक्रम सुद्धा रद्द झाले पाहिजेत, अशी भूमीका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख