रूपाली चाकणकर : धडाडीचे महिला नेतृत्व - Rupali Chakankar, President of the Women's Front of the ncp Congress Party | Politics Marathi News - Sarkarnama

रूपाली चाकणकर : धडाडीचे महिला नेतृत्व

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 8 मार्च 2021

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर एक धडाडीच्या महिला नेत्या आहेत.

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर एक धडाडीच्या महिला नेत्या आहेत. चित्रा वाघ यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्या जागी गेली सुमारे दीड वर्ष पक्षाच्या महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद त्या समर्थपणे सांभाळात आहेत. मूळच्या पुणेकर असलेल्या चाकणकर यांचे राज्यभर प्रभावी महिला संघटन आहे. सोशल मीडिया असो वा मीडिया त्या पक्षाची बाजू भक्कमपणे मांडत असतात.

व्यवस्थापन शास्त्रातील पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या चाकणकर या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील उच्च विद्याविभूषित व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. गेली २० वर्षे त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून पुण्यात काम करीत आहेत. पुणे महापालिकेची निवडणूक त्यांनी लढविली आहे. पक्षाच्या पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी बरीच वर्षे धडाडीने काम केले आहे. 

दीपक केसरकर म्हणतात....मी मंत्रीपदासाठी लाचार नाही

 

खडकवाला विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. मात्र, त्यांना संधी मिळू शकली नाही. पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात हा विधानसभा मतदारसंघ येतो. त्यामुळे खासदार सुळे यांच्या नेतृत्वाखाली या पुण्यात तसेच खडकवालसा मतदारसंघात मतदार संपर्क अभियानात त्या नेहमीच आघाडीवर असतात.

महिला राजकारणात आल्या तरच त्यांचे प्रश्न सुटतील...
 

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांना आमदारकी मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, अद्याप तरी ही शक्यता प्रत्यक्षात उतरली नाही. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपददेखील त्यांना खुणावत आहे. मात्र, तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये महामंडळांचे वाटप अद्याप झालेले नाही. त्यामुळे ती संधीदेखील अद्याप दूरच आहे. महिलांवरील अन्याय-अत्याचार असो वा कोणत्याही प्रकारचे मोर्चे-आंदोलन चाकणकर नेहमीच आघाडीवर असतात.

Edited By - Amol Jaybhaye
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख