पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती रोखण्यासाठी जयंत पाटलांनी प्रशासनाला लावले कामाला!

गेल्या काही वर्षांपासून कृष्णा-भिमा खोऱ्यातील भागात पूराचा त्रास जाणवत आहे.
 Jayant Patil .jpg
Jayant Patil .jpg

पुणे : पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) अ‍ॅलर्ट झाले आहेत. संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठी प्रशासनाने काय तयारी केली, याची माहिती पाटील यांनी संबंधितांकडून घेतली. (Review meeting held by Jayant Patil regarding possible flood control)

गेल्या काही वर्षांपासून कृष्णा-भिमा खोऱ्यातील भागात पूराचा त्रास जाणवत आहे. यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना पूराचा त्रास होऊ नये यासाठी पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात संभाव्य पूर नियंत्रणाबाबत जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

संभाव्य पूराचा धोका टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, पावसाच्या अतिरिक्त पाण्याचे नियोजन आदीचा आढावा घेण्यात आला. तसेच शेजारच्या राज्यांशीही चर्चाही सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्याच बरोबर पावसाळा सुरू होण्याआधीही बैठका घेतली जाईल अशी माहिती पाटील यांनी दिली. संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

2019 मध्ये पश्चिम महाराष्ट्राला पुराचा फटका बसला होता. पुराचा फटका पुन्हा बसू नये म्हणूनच या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेता पाटील यांनी संपूर्ण यंत्रणा अगोदरच अ‍ॅलर्ट केली आहे. या बैठकीला कृष्णा खोरे मंडळाचे कार्यकारी संचालक मुंडे, मुख्य अभियंता गुणाले, सांगलीचे अधिक्षक अभियंता नाईक, पुणे अधिक्षक अभियंता चोपडे, प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता विजय पाटील आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com