पोलिसांमधील देवत्व जागृत झाले तर काय होऊ शकते, हे कोरोनाने शिकवले...

कोरोना काळात पोलिसांना वाईटपणाही घ्यावा लागला. पण नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद भारावून टाकणारा होता.
rs16.jpg
rs16.jpg

पुणे : केंद्र सरकारकडून लॉकडाउन जाहीर करण्यापुर्वीच आपण पुण्यात काम सुरू केले होते. त्यावर रात्रं-दिवस चर्चा करून पहिली अॅार्डर पुण्यातून तयार करण्यात आली होती. प्रायोगिक तत्वावर एस. पी. कॉलेज रोड, जंगली महाराज रस्त्यासह अन्य भागातील हॉटेल व अन्य आस्थापने बंद करण्यात आले होते. पुण्यातून काढलेले आदेशच नंतर सरकारनेही प्रमाणित करून तसेच आदेश काढले, असे पुण्याचे सहपोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील पहिला कोरोनाचा रुग्ण पुण्यात आढळल्यानंतर संपुर्ण यंत्रणा त्याला रोखण्यासाठी कामाला लागल्या होत्या. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले निर्बंध, लॉकडाउनची अंमलबजावणी यामध्ये पुणे पोलिसांचा वाटा खूप महत्वाचा आहे. पोलिसांनी केलेल्या या अविस्मरणीय कामाबद्दल रविंद्र शिसवे यांनी 'सरकारनामा'च्या व्यासपीठावर मनमोकळा संवाद साधला. ते म्हणाले, केरळमध्ये कोरोनाचा प्रवेश झाल्यानंतर तो आपल्याकडे एवढ्या लवकर येईल, असे वाटलेही नाही. 

आपल्याकडे दुबईहून आलेले दाम्पत्य नऊ मार्चच्या सायंकाळी पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यानंतरचा पुढचा प्रवास खूप काही शिकविणारा होता. देशात 23 मार्चला लॉकडाउन लागला असला तरी आपल्याकडे 9 मार्चलाच रुग्ण आढळून आला असल्याने मधला काळ खूपच 'डायनॅमिक' होता. कारण कोरोनाविषयी कोणालाच फारसे काही माहिती नव्हते. एखादी बैठक झाल्यानंतर त्यात घेतलेले निर्णय वेगवेगळ्या मतप्रवाहांमुळे तासाभरात बदलले जात होते. इतर साथीचे आजार किंवा आपत्कालीन परिस्थिती आपण अनुभवली आहे. पण ही स्थिती वेगळी होती. त्याचा अनुभव कुणालाच नव्हता. त्यावर कसे नियंत्रण मिळवायचे, याचे काहीच तयार नव्हते.

पुण्यामध्ये कोरोना वेगाने वाढत गेला. पण लॉकडाउन केला नसला तर आतापेक्षा जास्त भयंकर स्थिती निर्माण झाली असती, हे तज्ज्ञांनीही मान्य केले आहे. पोलिसही समाजाचा एक भाग आहेत. लोकांप्रमाणे पोलिसही घाबरले होते. त्यामुळे पोलिसांचे मनोबल वाढविणे आवश्यक होते. त्यासाठी आम्हालाही रस्त्यावर उतरून फिरणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे होते. त्यानुसार प्रत्येकाने काम केले. लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात पुणे पोलिसांनी कसलीही कसूर केली नाही, याचा आम्हाला अभिमान आहे. असा प्रवाद आहे की, पुणेकर खूप डोकं लावतात. सजग, समंजस आहे आणि दिलेल्या सुचनांचे ते शंभर टक्के पालन करतात. पण हे खरे आहे. लॉकडाउन काळात याचा अनुभव आला. हे दुसरीकडे पाहायला मिळत नसल्याचे शिसवे यांनी स्पष्टपणे सांगितले.

पुण्यात या काळात नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण नगण्य होते. या काळात शहरात चोवीस तास 120 हून अधिक ठिकाणे नाकेबंदी केली जात होती. पासेसची मान्यता, रस्त्यावर होणारे वादाचे प्रसंग, यातून काहीही कारवाई करावी लागली, पोलिसांना वाईटपणाही घ्यावा लागला. पण यादरम्यान नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद भारावून टाकणारा होता. पोलिसांमधील देवत्व जागृत झाले तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय याकाळात आला. गुन्हांचे प्रमाण खूप कमी झाले. त्यामुळे संपूर्ण ताकद इकडे लावता आली. आमच्यासाठी प्रत्येक दिवस नवा होता, असे शिसवे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com