रवींद्र बिनवाडे पुणे महापालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त - Ravindra Binwade as Additional Commissioner of Pune Municipal Corporation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

रवींद्र बिनवाडे पुणे महापालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

  रुबल अग्रवाल यांची एकात्मिक बाल विकास योजनेच्या आयुक्तपदी बदली झाली

पुणे : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची एकात्मिक बाल विकास योजनेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. तर जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवाडे हे नवे अतिरिक्त आयुक्त असणार आहेत. राज्य सरकारने काल (ता. १३) सायंकाळी हे बदलीचे आदेश काढले.Ravindra Binwade as Additional Commissioner of Pune Municipal Corporation

रुबल अग्रवाल या १ जानेवारी २०१९ पासून पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. पुण्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना त्यावेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शिवाजीनगर येथील जम्बो कोवीड रुग्णालय चालविणे, आँक्सिजन प्लांटची निर्मिती, मनपा रुग्णालयांचे व्यवस्थापन करणे, कोरोना प्रतिबंधक लसीकरणात सुसूत्रता आणणे, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांसाठी आरोग्य व्यवस्था निर्माण करणे अशी महत्त्वाची कामे अग्रवाल यांनी पार पाडली. दरम्यान गेल्या दिवसांपासून बदलीची शक्यता वर्तवली जात होती, त्यानुसार हे आदेश काढण्यात आले आहेत. जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवाडे हे नवे अतिरिक्त आयुक्त असतील. बिनवाडे हे मुळचे बीडचे असून, ते २०१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यापूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर झाल्यानंतर त्यांनी मुंबई व पुण्यातील आयटी कंपनीत कार्यरत होते.

पुणे महापालिकेत मला जी जबाबदारी दिली ती समर्थपणे पार पाडली. लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचा भविष्यात देखील फायदा होईल.
रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त

प्रशांत किशोर राहुल गांधींना भेटले..भाजपविरोधी मोर्चेबांधणी?

नवी दिल्ली : पंजाबच्या निव़डणुकीची रणधुमाळी आणि उत्तर प्रदेशात निवडणुकीचे वाजलेले पडघम या पार्श्वभूमीवर राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधींची दिल्लीत घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. या भेटीमागच्या कारणांबाबत वेगवेगळे कयासही लढविले जात आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख