लेकीच्या भेटीला आलेल्या गुंडाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक - Rajgurunagar Two arrested in Rahul Wadekar murder case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

लेकीच्या भेटीला आलेल्या गुंडाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जुलै 2021

मिलिंद जगदाळे याच्यासह पाच जणांवर राजगुरुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राजगुरूनगर  : राजगुरुनगर Rajgurunagar येथे एका गुंडाची हत्या Rahul Wadekar झाल्याची घटना नुकतीच घडली होती. यातील मुख्य आरोपी मिलिंद जगदाळे याच्यासह पाच जणांवर राजगुरुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. Rajgurunagar Two arrested in Rahul Wadekar murder case

पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्हेगारीच्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेत मुख्य आरोपी मिलिंद जगदाळेसह दोघांना अटक केली आहे. अजूनही तीन आरोपी फरार आहेत. राजगुरुनगर शहरात तरुणवर्ग गुन्हेगारीकडे वळण घेत असताना पुणे ग्रामीण पोलीसांनी गुन्हेगारीचा खात्मा करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आल्याचे पोलिस निरिक्षक सतिश गुरव यांनी सांगितले

राजगुरुनगर Rajgurunagar शहरात तडीपार गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकर Rahul Wadekar याच्यावर दोन दिवसापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास पिस्तुलातून फायरिंग करत डोक्यात दगड टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.  

राजगुरुनगर शहरातील टोळीयुद्ध काही गुंडांच्या तडीपारीनंतर थांबले होते, मात्र, या घटनेमुळे गुन्हेगारीने पुन्हा तोंडवर काढत मध्यरात्री तडीपार असलेला गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकर याची हत्या करण्यात आली.  लेकीच्या भेटीला  वाडेकर आला होता. तो राजगुरूनगर शहरात येत असताना शहरालगत पाबळरोड येथे जुन्या गुन्हेगारी वादातून वाडेकर याच्या पिस्तुलातून फायरिंग करुन त्याच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात वाडेकरचा जागीच मृत्यू झाला होता. राजगुरुनगर पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तपास सुरु केला होता.

ग्रामीण भागात लहान वयातील गुन्हेगारी, टोळीयुद्ध संपविण्याचे पुणे ग्रामीण पोलिसांसमोर मोठे आव्हान असताना काही टोळ्या प्रमुखांना तडीपार केले होते. मात्र, साथीदारांकडून एकमेकांना शह देण्याचे काम सुरुच राहिल्याने अशा घटना होत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.  

प्रदीप शर्मांच्या अडचणीत वाढ ; राजू राव याचा जबाब ठरणार महत्वाचा
 मुंबई  : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करीत आहे. हिरेन हत्येप्रकरणी माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अटकेनंतर शर्मा यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांची  NIA कडून चौकशी करण्यात येत आहे.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख